महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असो.संघटनेच्या मराठवाडा विभागिय अध्यक्षपदी - सौ सुनंदा पोपटराव शिंदे यांची निवड,

Ank news marathi team

Aurungabad

Deat,26.12.2021

Ank news marathi ,मुख्य संपादक,

अशोक कराळे वैजापूर औरंगाबाद,

 महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असो.संघटनेच्या मराठवाडा विभागिय अध्यक्षपदी - सौ सुनंदा पोपटराव शिंदे यांची निवड,



 औरंगाबाद महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असो. संघटनेच्या वतीने पोलीस पाटील दिनानिमित्त औरंगाबाद येथे बैठकीचे व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये राज्य कार्यकारणीच्या एकमताने वैजापुर तालुक्यातील एकोडी सागज येथिल श्रीमती सुनंदा पोपटराव शिंदे यांची महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असो. संघटनेच्या *मराठवाडा विभागिय अध्यक्षपदी* निवड करण्यात आली असुन त्यांना संघटनेचे राज्य अध्यक्ष महादेव नागरगोजे, राज्य समन्वयक कारभारी निघोटे, प्रसिद्धी प्रमुख निरंजन गायकवाड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.महाराष्ट्र राज्य पोलीस असो.संघटनेच्या वतीने पोलीस पाटील दिनानिमीत्त आयोजित मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणुन औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक IPS निमित गोयल हे उपस्थित होते तर जे जे प्लस हॉस्पीटलचे संचालक प्रसिद्ध निर्रो सर्जन डॉ जीवन राजपुत हे अध्यक्ष स्थानी होते.सौ सुनंदा पोपटराव शिंदे ह्या एकोडी सागज या गावच्या पोलीस पाटील असून गावातील तंटे गावातच मिटविणे व गावात शांतता प्रस्तापित करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम चोखपणे निभवताहेत, पोलीस पाटील म्हणजे पोलीस,महसुल प्रशासन व गाव यांच्या मधील दुवा आहे. गावातील राष्ट्रीय संपत्ती गौण खणिजाचे रक्षण करणे . गावात घडणाऱ्या गंभीर गुन्ह्याची माहीती तात्काळ पोलीस प्रशासनास देणे व इतर छोटे मोटे वादविवाद मिटवण्याचे काम पोलीस पाटलांचे असते परंतु त्या ही पुढे जाऊन पोलीस पाटील सौ सुनंदा शिंदे यांनी स्त्रीसक्षमीकरणाचे काम हाती घेऊन अनेक स्त्रीयांना स्वावलंबी बनण्यास मदत केली आहे .तसेच प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या शाळेत जाऊन अनेक गरजुवंत विद्यार्थ्यांना शालेय साहीत्याचे  देखिल त्या वाटप करत असतात .

 


कोविड 19 कोरोना महामारी काळामध्ये देखिल त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत अनेक गोरगरीबांना व गरजुंना अन्न,वस्त्र, पाणी, मेडीकल औषधी, किराणा सामान कीट व इतर जीवनआवश्यक वस्तुचे वाटप करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे .आपण प्रत्येकाने समाज सुधारण्यासाठी समाज हिताचे काम केले पाहीजे अशी त्यांची धारणा आहे म्हणुन एक महिला पोलीस पाटील असून देखिल त्यांनी आतापर्यंत औरंगाबाद जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या माध्यमातुन समाजिक क्षेत्रामध्ये व संघटनेमध्ये उत्कृष्ट कार्य केले आहे त्यामुळे सौ सुनंदाताई शिंदे यांना आत्तापर्यंत विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्याबद्दल अनेक पुरस्काराने सन्मानित देखिल करण्यात आले आहे.म्हणुन त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असो संघटनेने त्यांची मराठवाडा विभागिय अध्यक्षपदी निवड केली आहे .या कार्यक्रमाची सुरुवात छात्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पुजनाने करण्यात आली.यावेळी बोलतांना पोलीस अधीक्षक निमित गोयल म्हणाले की पोलीस पाटील हा पोलीसांचा ग्रामीण भागातील मुख्य कणा आसुन कान नाक डोळा आहे .पोलीस पाटलांचे कोरोना काळातील काम वाखण्याजोगे आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला येणे मला कर्तव्याचे होते. श्री गोयल हस्ते उत्कृष्ट कार्य करणारे आदर्श पोलीस पाटील, पत्रकार, डॉक्टर, समाजसेवक,शिक्षक, फायर ब्रिगेड, महसुल विभागातील३१ जणांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ जीवन राजपुत, मनोहर गावडे, महादेव नागरगोजे यांनी देखिल मार्गदर्शन केले. पोलीस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष महादेव नागरगोजे, राज्य समन्वयक कारभारी निघोटे, प्रसिध्दी प्रमुख निरंजन गायकवाड, मराठवाडा विभागिय अध्यक्ष सुनंदा शिंदे, मराठवाडा उपाध्यक्ष डोळस पाटील,ढगे पाटील जालना,पोपटराव शिंदे पाटील जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय कराळे, निलेश आव्हाळे, साळुंके, सुर्यकांत मोटे, वासुदेव  बोर्डे,आप्पासाहेब गायकवाड, अशोक साठे, वनमाला धोर्डे, सविता सरोवर, देवका भक्कंड, प्रदिप गाढे, दिपक देवकर अदीसह राज्यभरातील पोलीस  पाटीलांची उपस्थिती होती .




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक