Ank news marathi team
वैजापूर
Deat,26.12.2021
Ank news marathi.मुख्य संपादक,अशोक कराळे,वैजापूर औरंगाबाद,
वैजापूर निराधारांचे ४२०० प्रकरणे प्रलंबित,तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मनमानी कारभार,
वैजापूर- विशेष सहाय्य योजनेच्या येथील तहसिल कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात सध्या पुरता सावळा गोंधळ निर्माण झाला आहे.या योजना समीतीची दीड वर्षापासून बैठक न झाल्याने ४ हजार २०० प्रकरणे धुळ खात पडून आहेत.
दरम्यान निराधार,दिव्यांगाना जाणवत असलेल्या समस्या वरून तहसिल कार्यालयात जाऊन अनेक वेळा तक्रारी व आंदोलने करावे लागतात.
राज्य शासनाकडून दिव्यांग व्यक्ती , वृद्ध , निराधार ,विधवा,महिलांसाठी अनुदान योजना राबविण्यात येते.तहसिल कार्यालयात यासाठी स्वतंत्र कार्यालय थाटण्यात आले आहे.मात्र येथील तहसील कार्यालयात असलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात गेल्या अनेक दिवसांपासून सावळा गोंधळ निर्माण झाला आहे.अधिकारी व कर्मचारी यांची मुजोरी वाढली असून दलालाशिवाय कामेच होत नसल्याने नागरिकांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहे.खऱ्या अर्थाने पात्र असलेल्या लाभार्थ्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.याबाबत अनेक जण तक्रारी करतात.परंतू अधिकारी व कर्मचारी या तक्रारीची दखल घेऊन कारभार सुधारण्यास तयार नाही.अधिकाऱ्यांच्या लेट लतीफ शाहीमुळे ४ हजार २०० प्रकरणे प्रलंबित आहेत. या योजना समीतीचे तहसिलदार अध्यक्ष असून समीतीची दिड वर्षांपासून बैठकच झालेली नाही.खऱ्या लाभार्थ्यांच्या अर्जांना मंजूरी देण्यात येत नसल्याने विवीध योजनेचे लाभार्थी कार्यालयात चकरा मारत आहे.
विशेष सहाय्य योजना अनुदान योजने अंतर्गत विवीध योजनेचे तालुक्यात २१ हजार ८४८ लाभार्थी असून त्यांनाही वेळेवर अनुदान मिळत नसल्याने तेही बॅंक व तहसिल कार्यालयात हेलपाटे मारीत आहेत.या योजनेच्या इंदीरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेचा अद्याप एकही लाभार्थी नसल्याचे दिसून आले आहे.
विशेष सहाय्य योजनेचे तालुक्यात असलेले लाभार्थी पुढील प्रमाणे.
संजय गांधी निराधार योजना सर्वसाधारण-२७५९
संजय गांधी निराधार योजना अनुसूचित जाती-८३२
संजय गांधी निराधार योजना अनुसूचित जमाती-१३२
श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन सर्व साधारण-६७१९
श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन अनुसूचित जाती-१७१५
श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन अनुसूचित जमाती-४४१
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना-८८७५
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना-३५५
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना- २२
असे एकुण विवीध योजनेचे तालुक्यात एकुण २१ हजार ८४८ लाभार्थी असून ४ हजार २०० प्रकरणे प्रलंबित आहेत.
