Ank news marathi team
Aurungabad
Deat,05.09.2021
लोणी सर्कल प्रतिनिधि ,दादासाहेब तांबे वैजापूर औरंगाबाद,
औरंगाबाद मालेगाव हायवेला पडले खड्डेस खड्डे,
वैजापूर तालुक्यामधील शिऊर बंगला ते तलवाडा सतरा किलोमीटर रस्त्याला अनेक ठिकाणी खूप मोठ मोठे खड्डे झाले आहे त्यात कन्नड घाट बंद झाल्यामुळे या रस्त्यावर रहदारीला वेग आला आहे परंतु हा रस्ता खूप मोठ्या प्रमाणात फुटलेला आहे त्यामुळे नागरिकांना दुचाकी आणि चारचाकी छोट्या गाड्यांना खूप अडचणी येऊ लागल्या आहे कन्नड घाटामध्ये रस्ता सुरळीत नसल्यामुळे त्या रस्त्याची रहदारी जास्त प्रमाणामध्ये वाढली आहे ट्रक कंटेनर हेदेखील या रस्त्याने चालू झाले आहे तलवाडा घाटामध्ये रस्ता रुंदी कमी असल्यामुळे वाहनधारकांना एक एक गाडी काढाव लागत आहे त्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम होत आहे आणि रस्त्याला खूप मोठाले खड्डे पण असल्यामुळे खूप वेळ लागत आहे खड्डे असल्यामुळे वाहन धारक त्रस्त झाले आहेत पाच ते चार महिन्यापासून बरेच अपघात या रस्त्याला देखील झाले आहे . या खड्ड्यांमध्ये गाड्या बंद पडत आहे या खड्ड्यांचा त्रास वाहनचालकांना होत आहे. तसेच कन्नड घाट बंद असल्यामुळे परिवहन महामंडळाच्या बस देखील या रस्त्याने चालू झालेला आहे. त्या बस मध्ये प्रवास करणारे नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे .या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टदार यांनी या खड्डे बुजवण्यासाठी लक्ष देत नाहीत . टुणकी ते तलवाडा काम काही वर्षापुर्वी झाले परंतु आता अनेक ठीकाणी खड्डे पडले आहेत . कन्नड घाट सुरू होण्यास विलंब झाल्यास हा रस्ता पुर्णपणे ओव्हर लोड वाहतुक झाल्याने खराब होईल. अनेक वर्षांपासून निधी या रस्त्याला मिळालेला नाही त्यात खड्डे वाढले तर स्थानिकांना त्रास सहन करावा लागणार आहे .




🙏🙏🙏🙏👍👍👍
उत्तर द्याहटवा