Ank news marathi team
Nashik
Deat,05.08.2021.
मुख्य संपादक ,अशोक कराळे,वैजापूर औरंगाबाद.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नाशिक जिल्हा शाखेने घडवून आणली बाप लेकिची भेट.
नाशिक,आहुर्ली : ईगतपुरी तालुक्यातील दोन किशोरवयीन मुली, आई बापावर रागावून रागाच्या भरात त्यांनी घर सोडून एका धार्मिक आश्रमाचा आश्रय घेतला होता. दरम्यान ही घटना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी यांना समजताच त्यांनी तातडीने हालचाली करत पोलीसाच्यां मध्यस्थीने त्या दोन्ही मुलीचीं बापा समवेत भेट घडवून आणत मुलीनां सुखरूप घरी पोहोचते करण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे पुढील होणारा अनर्थ टळला आहे.
याकामी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख नवनाथ अर्जुन पा. गायकर, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब गोसावी, वाडिवर्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव, पत्रकार अशोक शिंदे आदींनी या घटनेत तत्परता दाखवत रागावलेल्या मुलीनां सुखरूप पणे बापाच्या स्वाधीन केले आहे.
दरम्यान पोलीस यंत्रणेने, मुलीच्या वडिल व नातेवाईक यांनी या घटनेच्या पाश्वर्भुमीवर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे व राज्य पदाधिकाऱ्यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या नाशिक कार्यकारिणीचे अभिनंदन केले आहे तर बापलेकिच्या नातेवाईकांनी तत्परतेचे कौतुक करत आभार मानले आहेत.



