Ank news marathi team
Yiajapur
Deat.31:07:2021
लोणी खुर्द येथील शेतकऱ्यांनी लोक वर्गणीतून रस्ता मोकळा करून कायमचा तोडगा काढला.
लोणी खुर्द / प्रतिनिधी. दादासाहेब तांबे वैजापूर औरंगाबाद,
वैजापूर तालुक्यातील दि.30:या दिवशी गाव रस्ते, पांदन रस्ते,शिवार रस्ते व पुर्वीपार वहिवाटी खाली असलेले रस्ते मोकळे करणे व शेतजमीनीत जाण्यायेण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी गाव रस्ता समिती नेमून प्रकरणे निकाली काढणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे सांगितले जाते. परंतु त्या पचाड्यात न पडता वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथील शेतकऱ्यांनी सामोपचाराने तोडगा काढला आणि एकत्रितपणे लोकवर्गणीतून मुरुम टाकून एकदाचा तो तिडा संपुष्टात आणून एकमेकांना समजून घेऊन सर्वांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावून एक आदर्श निर्माण केला.
याकामी येवला जिल्हा नाशिक येथील सेवा निवृत्त आर्मी सेनेच्या कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून सामोपचाराने हा प्रश्न सोडवल्याने सर्वांनी समाधान व्यक्त करून आर्मी सेनेच्या कार्यकर्त्यांचे व ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी.उपसरपंच आप्पासाहेब जाधव, रामभाऊ अवचिते, रऊफ दादा सय्यद, नारायण सोमासे, कचरू सोमासे,येवला सैनिक ग्रुप अध्यक्ष सुशिल शिंदे ,उपाध्यक्ष मेजर धनवटे, वैजापूर चे सचिव बाळासाहेब जाधव ,मनोज सोनवणे, शरद कोकाटे,भा.ज.प, युवा सरचिटणीस अनिल पवार, शिवाजी कुमावत अन्वर सैय्यद राधू नाना जाधव, बबन जगधने रामनाथ जगधने सुनील जगधने नारायण सोमासे कचरु मामा सोमासे रोपेदादा सैय्यद भाऊसाहेब पवार समाधान पवार बाळू बागूल, तुळशीराम पवार, संजय बागूल, दीपक बागुल ज्ञानेश्वर जाधव ,सोनू पवार, कैलास जगधने, देवराव बागुल, रमेश जाधव, नानासाहेब बागुल, दादा साहेब बागुल, बाबासाहेब बागुल, रतन एकनाथ बागुल बाळासाहेब बागुल केशव सोमासे ,वसंत सोमासे, गोटीराम सोमासे ,भाऊसाहेब पवार, मधुकर पवार, संतोष बोर्डे, संतोष जाधव, रामेश्वर बोर्डे, नवनाथ कावरे, सुदाम पवार आदी शेतकऱ्यांची उपस्थीती होती.



