ank News Marathi team
Aurungabad
deat 22.03.2021
ank News संपादक ,अशोक कराळे,वैजापूर औरंगाबाद,
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची लासुरगावाला भेट
औरंगाबाद दि 21 (जिमाका) - कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लासुरगावला भेट दिली आणि गावातील आरोग्य उपकेंद्रांची पहाणी केली. तसेच सर्वांच्या सहकार्याने कोरोनावर मात करण्याचे आवाहन देखील केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदावले उपस्थित होते.
भेटीदरम्यान तेथील व्यवस्था ही समाधानकारक असल्याने वैदकीय पथकाचे आणि आशा कर्मचाऱ्यांचे कौतुक देखील जिल्हाधिकारी यांनी केले.
यावेळी तेथील पथकातील डॉक्टरांनी पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगताच मार्च महिना संपण्याच्या आधी गावाला "सोलर हिटरची सुविधा दिली जाईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
लासुर गावामध्ये एकूण 22 कोरोना रुग्ण सापडले आहेत आणि 2 रुग्ण हे होम आईसोलेशन मध्ये आहेत.ही चिंतेची बाब आहे असे सांगत जिल्हाधिकारी यांनी गावात फवारणी करण्याचे आणि लाऊड स्पीकरने जनजागृती करण्याचे निर्देश केले. जिल्हाधिकारी पथकाने पाँझिटिव्ह आलेल्या कोरोना रुग्णांचा परिसर बघितला आणि कंटेन्मेंट झोन बनवण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी गावातील ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी श्रमदानातून गावाचा विकास करण्याचे त्यांनी सुचवले.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी "माझे कार्यालय सुंदर कार्यालय" आणि "माझे गाव स्वच्छ गाव" या योजनेविषयी माहिती देत,या योजनांचा फायदा घेण्याचे ग्रामस्थांना आव्हान केले.
Tags:
आरोग्यविषयक



Casino - Bracket betting guide for your chance to win
उत्तर द्याहटवाThe Casino is a gri-go.com unique casino that has been around for over poormansguidetocasinogambling a decade. titanium flat iron It has managed to offer great games such as Blackjack, Roulette herzamanindir.com/ and Video Poker,