Ank news Marathi team aurungabad
Deat,06, 11,2020,
बाभूळतेल येथील तलाठी शहरात वास्तव्यास, शेतकऱ्यांची विविध कामांसाठी तलाठ्याची करताय शोधाशोध.
लोणी खुर्द / प्रतिनिधी दादासाहेब तांबे वैजापूर ॵरगाबाद
तलाठी हा गावाचा मुख्य दुवा असल्याने शेतकऱ्यांना अनेक कामांसाठी तलाठी साहेबांची आवश्यकता भासत असते. मात्र तलाठी साहेब गावात कधी येणार या आशेने शेतकरी मात्र तलाठ्यांच्या सांगितलेल्या ठिकाणी हेलपाटे मारतात तरी देखील मुजोर तलाठी शेतकऱ्यांना भेटत नाही. विशेष म्हणजे हे तलाठी साहेब शहरात वास्तव्यास असल्याने त्यांचा सर्व कारभार खाजगी व्यक्ती बघतात. सध्याच्या घडीला शेतकऱ्यांची कर्जमाफी साठी लागणारे अनेक कागदपत्रे ही तलाठ्याशिवाय पूर्ण होत नाही. तलाठी कार्यालयात तर सोडा आसपास कुठेही दिसत नाही.तलाठी न भेटल्यामुळे बाभूळतेल गावातील शेतकरी तसेच सामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.वैजापूर तालुक्यातील अनेक गावातील तालाठ्याच्या बदल्या झाल्या आहेत.कोणता तलाठी गावात आला आहे ही कल्पना देखील गावकऱ्यांना नाही. पूर्वीच्याच तालाठ्याला संपर्क करून गावकरी हैराण झाले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार महसूल विभागाचा कर्मचारी हा नोकरीच्याच ठिकाणी वास्तव्यास हवे परंतु तालुक्यात कुठेही असे चित्र दिसत नाही. एकप्रकारे येथे वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपलीच दाखवली जात आहे. बाभूळतेल गावात तलाठी नियमित न आल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये तीव्र रोष दिसून येत आहे.

