देवरी बीडीओ सह सर्वच विभागप्रमुख कार्यालयातून बेपत्ता

  Ank news Marathi team godhiya

Death, 07,10,2020,


देवरी बीडीओ सह सर्वच विभागप्रमुख कार्यालयातून बेपत्ता, 


देवरी तालुका प्रतिनिधी मोहित तुरकर देवरी गोंदिया, 

देवरी,दि.07 : तालुक्याचे महत्त्वाचे कार्यालय असणाऱ्या देवरी पंचायत समितीला आज मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते भुपेन्द्र मस्के यांनी भेट दिली असता यावेळी बरेचसे कर्मचारी दौ-यावर असल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात त्याची हलचल रजिस्टरमध्ये नोंद नसल्याने पंचायत समिती कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाटयावर आलेला आहे.

विविध शासकीय कामांसाठी तालुक्यातुन शेकडो नागरिक पंचायत समिती कार्यालयास भेट देतात. अनेक गावांचे सरपंच , सदस्य व नागरिक पंचायत समितीला कामानिमित्त भेटी देतात.मात्र आज जेव्हा कार्यालयास भेट दिली,तेव्हा गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, विस्तार कर्मचारी, मनरेगा अंतर्गत काम करणारे कर्मचारी अनुपस्थित आढळून आले.कार्यालयात विचारणा केली असता ते दौऱ्यावर व हलचल नोंदवहीत नोंद नाही.यावरून गटविकास अधिकारी यांचे भोंगळ कारभार व प्रशासनावर पकडच नसल्याचे दिसून येते.

विशेष म्हणजे पंचायत समिती कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी दौरा करू नये असे पंचायत समितीच्या मासिक बैठकीत ठरवले गेले होते. पण लोकप्रतिनिधी नसल्यामुळे कर्मचारी बेशिस्त झाले कि काय? असा प्रश्न पडला आहे . कोरोना परिस्थितीचा फायदा घेत प्रत्येक दिवशी मोठ्या प्रमाणात कर्मचारी गैरहजर आढळून येतात त्यामुळे नागरिकांचे कामे रेंगाळली आहेत. विशेषतः मनरेगाचे व्ययक्तिक लाभाचे एकही काम प्रगतीपथावर नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक