Ank news Marathi team godhiya
Deat, 02,10,2020,
देवरी तालुक्यातील शिवापूर येथे बापानेच केली मुलाची हत्या,
देवरी तालुका प्रतिनिधी, मोहित तुरकर देवरी गोंदिया,
देवरी,दि.01:-तालुक्यात काही दिवसापासून हत्यांचा थरार सुरु असून शिलापूर गावात आज गुरुवारला सकाळच्या सुमारास बापानेच मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
सविस्तर असे की, देवरी तालुक्यातील शिलापूर येथील रहिवासी असलेल्या मुलाला नेहमीच्या घरगुती वादाला कंटाळून रागाच्या भरात काठीने बेदम मारहाण करुन ठार केल्याची घटना घडली.मृताचे नाव माखन सखाराम वघारे (३७)असे आहे.तर आरोपीचे(वडील) सखाराम सदाराम वघारे असे नाव असून देवरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पुढील तपास देवरीचे ठाणेदार अजित कदम करीत आहेत.
Tags:
क्राईम

