देवरी व अर्जुनी-मोर आंदोलनात कॉंग्रेसने मोदी सरकारचा नोंदवला निषेध

Ank news Marathi team godhiya, 

Deat, 03,10,2020,

 देवरी व अर्जुनी-मोर आंदोलनात कॉंग्रेसने मोदी सरकारचा नोंदवला निषेध

देवरी तालुका प्रतिनिधी मोहित तुरकर देवरी गोंदिया, 



 दि.2.अर्जुनी मोरगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कृषी व कामगार विधेयकाविरोधात तसेच हाथरस येथील तरुणी मनीषा वाल्मिकी बलात्कार व खून याप्रकरणी नवेगावबांध येथील टी पॉईंट चौकात धरणे आंदोलन आज 2 ऑक्टोंबरला करण्यात आले. भाजपाप्रणीत काँग्रेस सरकार विरोधात नारेबाजी करून निषेध नोंदविण्यात आला.

त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद व गृहमंत्री भारत सरकार यांना केंद्र सरकारने आणलेले तीन काळे कायदे कृषी व कामगार संबंधात केलेले कायदे रद्द करण्यात यावे. तसेच उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील मनीषा वाल्मिकीच्या वर झालेल्या बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. या आशयाचे निवेदन अर्जुनी मोरगाव उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांच्यावतीने पाठविण्यात आले.

सकाळी 11 वाजता टी पॉईंट चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला अभिवादन करून अर्जुनी मोरगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. तालुका काँग्रेस अध्यक्ष भागवत नाकाडे, असंघटित कामगार सेलचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, अनुसूचित जाती सेलचे अनिल दहिवले ,किसान आघाडीचे अध्यक्ष डॉ.देवाजी कापगते, रत्नदीप दहिवले यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणांचा निषेध केला. या धरणे आंदोलनात किसान काँग्रेसचे अध्यक्ष देवाजी कापगते, ओबीसी सेलचे सुभाष देशमुख, तालुका सेवादलाचे अध्यक्ष रवींद्र खोटेले, काँग्रेस सेवादलाचे परेश उजवणे ,आदिवासी काँग्रेस सेलचे बाबुराव काटेंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य गिरीश पालीवाल ,विशाखा साखरे ,इंद्रदास झिल्पे, रत्नदीप दहिवले ,लीलाधर ताराम, तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष शीलाताई उईके ,माजी पंचायत समिती सदस्य प्रेमलाल गेडाम, अर्जूनी काँग्रेस अध्यक्ष अजय पशिने, नारायण डोये, संतोष नरुले, कमल जयस्वाल, मोठा भाई पटेल, बन्सीधर लंजे, जगदीश पवार, सुशीला बडोले, युवराज जांभूळकर, केवलराम भंडारी या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. कुठलाही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून व कायदा सुव्यवस्था कायम राहावे म्हणून येथील पोलिस ठाण्याचे ठाणेदार दिनकर ठोसरे यांच्या नेतृत्वात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

देवरी येथे आमदार कोरेटेंच्या नेतृत्वात केंद्रसरकारच्या धोरणांविरुध्द निघाला मोर्चा देवरीः--तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मोदी सरकारने पारित केलेल्या कृषिविषयक विधेयकाच्या विरोधात निषेध आंदोलन आमगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.आंदोलनांतंर तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप भाटिया,राधेश्याम बगडिया,ओमप्रकाश रामटेके,प्रशांत संगीडवार,जीते भाटिया,उषाताई शहारे,सीमा कोरोटे,शुभद्राताई,जीवन सलामे,बळीराम कोटवार,चैनसिंग मडावी,सोनू नेताम,शकील कुरेशी,अविनाश टेंभरे,अमित तर्जुले,वैभव जैन,नर्मदा महाराज,ओमराज बहेकार,छगनलाल मुंगणकर, कुलदीप गुप्ता,रोशन भाटिया,प्रशांत कोटांगले यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



अर्जुनी-मोर दि.2.अर्जुनी मोरगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कृषी व कामगार विधेयकाविरोधात तसेच हाथरस येथील तरुणी मनीषा वाल्मिकी बलात्कार व खून याप्रकरणी नवेगावबांध येथील टी पॉईंट चौकात धरणे आंदोलन आज 2 ऑक्टोंबरला करण्यात आले. भाजपाप्रणीत काँग्रेस सरकार विरोधात नारेबाजी करून निषेध नोंदविण्यात आला.

त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद व गृहमंत्री भारत सरकार यांना केंद्र सरकारने आणलेले तीन काळे कायदे कृषी व कामगार संबंधात केलेले कायदे रद्द करण्यात यावे. तसेच उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील मनीषा वाल्मिकीच्या वर झालेल्या बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. या आशयाचे निवेदन अर्जुनी मोरगाव उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांच्यावतीने पाठविण्यात आले.

सकाळी 11 वाजता टी पॉईंट चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला अभिवादन करून अर्जुनी मोरगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. तालुका काँग्रेस अध्यक्ष भागवत नाकाडे, असंघटित कामगार सेलचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, अनुसूचित जाती सेलचे अनिल दहिवले ,किसान आघाडीचे अध्यक्ष डॉ.देवाजी कापगते, रत्नदीप दहिवले यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणांचा निषेध केला. या धरणे आंदोलनात किसान काँग्रेसचे अध्यक्ष देवाजी कापगते, ओबीसी सेलचे सुभाष देशमुख, तालुका सेवादलाचे अध्यक्ष रवींद्र खोटेले, काँग्रेस सेवादलाचे परेश उजवणे ,आदिवासी काँग्रेस सेलचे बाबुराव काटेंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य गिरीश पालीवाल ,विशाखा साखरे ,इंद्रदास झिल्पे, रत्नदीप दहिवले ,लीलाधर ताराम, तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष शीलाताई उईके ,माजी पंचायत समिती सदस्य प्रेमलाल गेडाम, अर्जूनी काँग्रेस अध्यक्ष अजय पशिने, नारायण डोये, संतोष नरुले, कमल जयस्वाल, मोठा भाई पटेल, बन्सीधर लंजे, जगदीश पवार, सुशीला बडोले, युवराज जांभूळकर, केवलराम भंडारी या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. कुठलाही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून व कायदा सुव्यवस्था कायम राहावे म्हणून येथील पोलिस ठाण्याचे ठाणेदार दिनकर ठोसरे यांच्या नेतृत्वात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

देवरी येथे आमदार कोरेटेंच्या नेतृत्वात केंद्रसरकारच्या धोरणांविरुध्द निघाला मोर्चा देवरीः--तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मोदी सरकारने पारित केलेल्या कृषिविषयक विधेयकाच्या विरोधात निषेध आंदोलन आमगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.आंदोलनांतंर तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप भाटिया,राधेश्याम बगडिया,ओमप्रकाश रामटेके,प्रशांत संगीडवार,जीते भाटिया,उषाताई शहारे,सीमा कोरोटे,शुभद्राताई,जीवन सलामे,बळीराम कोटवार,चैनसिंग मडावी,सोनू नेताम,शकील कुरेशी,अविनाश टेंभरे,अमित तर्जुले,वैभव जैन,नर्मदा महाराज,ओमराज बहेकार,छगनलाल मुंगणकर, कुलदीप गुप्ता,रोशन भाटिया,प्रशांत कोटांगले यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक