Ank news Marathi team aurungabad
Deat, 26,09,2020,
वैजापूर शहरातील एका प्रतिष्ठीत कुटुंबातील दोन महिलांसह पाच जणांचा कोरोनो आजारामुळे मुत्यु,
वैजापूर प्रतिनिधी ,दादासाहेब तांबे पाटील लोणी वैजापूर ॵरगाबाद
वैजापूर तालुक्यातील कोरोना आजारामुळे मागील काही दिवसातच शहरातील एका प्रतिष्ठीत कुटुंबातील दोन महिलांसह पाच जणांचा मृत्यु झाला. यात तीन सख्ख्या भावांचा समावेश आहे. या घटनेमुळे या कुटुंबावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाल्याचे उघडकिस आले आहे. करोना रुग्णांच्या संख्येने तालुक्यात हजाराचा आकडा केव्हाच पार केला असुन अजुनही दररोज करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शहरातील उपजिल्हा रुग्णालय व शिवराई रस्त्यावरील निवासी शाळेत स्थापन करण्यात आलेल्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये करोना रुग्णांवर उपचार सुरू असुन आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचार घेतल्यानंतर ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या रुग्ण पॉझिटिव्ह आहे कि निगेटिव्ह हे ठरवण्यासाठी व गतीने निदान करण्यासाठी घेण्यात येणारी अँटीजेन चाचणी बंद करण्यात आली असुन रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होणे, सर्दी, पडसे ताप येणे यासारखी लक्षणे आढळुन आल्यास त्याची स्वँब चाचणी करण्यात येऊन निदान करण्यात येत आहे. अँटीजेन चाचण्या बंद झाल्या असल्या तरी मागील काही दिवसात करोनाच्या साथीचा विळखा आणखी घट्ट झाला असुन नागरिक सुरक्षित अंतर व तोंडाला मास्क लावणे यासारख्या शासकिय उपाययोजनांकडे पाठ फिरवत असल्याचे दिसुन येत आहे. बाजारात गर्दी कायम आहे. त्याचे दुष्परिणाम दिसुन येत आहे. करोना सदृश्य रोगाचा फैलाव होण्याची शक्यता वाढली आहे. मागील काही दिवसातच अनेकांना करोना सदृश्य आजारामुळे मृत्युला सामोरे जावे लागले आहे. अर्थात यात जेष्ठ नागरिकांचे प्रमाण मोठे असुन वयोमानानुसार होणाऱ्या इतर आजारांसोबतच करोनाचाही संसर्ग झाल्याने मृत्यु होत आहेत. मागील काही दिवसातच एकाच कुटुंबातील पती पत्नी, तीन भाऊ, भाऊ बहिण अशा पाच जणांचा काही दिवसांच्या अंतराने उपचारादरम्यान करोनासदृश्य आजारामुळे मृत्यु झाल्याचे उघडकिस आले आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे.
"आधी न्युमोनियाचे निदान"
एखाद्या रुग्णाला पाच टक्क्यांपर्यंत न्युमोनिया झाल्याचे निदान झाल्यास त्याचा अहवाल पॉझिटिव्ह असो कि निगेटिव्ह त्याच्यावर कोव्हीड-१९ चे उपचार सुरु केले जातात अशी माहिती आहे. वयस्कर लोकांमध्ये कधी कधी करोनासोबतच ह्रदयविकार, किडनीचे काम बंद होणे तसेच फुफ्फुसाच्या विकारामुळेही मृत्यु होण्याचे प्रमाण आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या हे पाचही जण ६५ वर्ष वयाच्या पुढील आहेत.यातील दोघांना कुठलाही दुसरा आजार नव्हता.एका महीलेस संधीवात तर दोघांना मधूमेह होता.या कुटुंबातील बहीणीचा पहीला मृत्यू मालेगाव येथे एप्रिल महिन्यात झाला.आगष्ट महीन्यात दुसरा तर सप्टेंबर तीघांचा मृत्यू झाला.१२,१६ व २३ सप्टेंबर रोजी हे मृत्यू झाले.सर्व कुटुंबीय लाॅकडाऊन पासून घरीच राहत होते.

