Ank news Marathi team godhiya
Deat, 20,09,2020,
गोंदिया जिल्हा प्रतिनिधी, शैलेश राजनंकर ,देवरी, गोंदिया,
रानडुकराच्या मांसासह दोघांना अटक,
अर्जुनी मोरगाव,दि.19 : तालुक्यातील दिनकरनगर येथे रानडुकराच्या मांसासह दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई गोठणगाव वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या पथकाने केली. रमेश गणेश डकुवा व राम माणिक सिंग रा.दिनकरनगर अशी आरोपींचे नावे आहेत.
दिनकरनगर येथे रानडुकराची शिकार करून मांस विक्री केली जात असल्याची माहिती गोठणगाव वनक्षेत्राधिकारी पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर वनविभागाचे अधिकारी, कर्मचार्यांनी दिनकरनगर येथील रमेश गणेश डकुवा यांच्या घराची झडती घेतली. दरम्यान त्यांच्याकडे मांस दिसून आला. त्याची विचारपूस केली असता राम माणिक सिंग याच्याकडून मांस विकत आणल्याचे सांगितले. यावरून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

