वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे मक्का खरेदी केद्र सुरू करा- संतोष सुर्यवंशी,

Ank news Marathi team aurungabad

Deat, 24,09,2020

 वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे मक्का खरेदी केद्र सुरू करा- संतोष सुर्यवंशी, 

लोणी (प्रतिनिधी ) दादासाहेब तांबे पाटील , 


वैजापुर कृषी उत्पन्न बाजार समिती ने लोणी खुर्द येथे उपबाजार अंतर्गत मक्का खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकरी नेते तथा मा. संचालक संतोष सुर्यवंशी यांनी केली आहे. तसे निवेदन त्यानी बाजार समितीला दिले आहे. लोणी खुर्द ता. वैजापुर येथे मागील वर्षी उपबाजार अंतर्गत मक्का खरेदी केद्र सुरू केल्याने मक्का उत्पादक शेतकरयाना मोठा दिलासा मिळाला होता व बाजार समिती आवारात मक्का खरेदीसाठी अनेक व्यापारयानी बाजार समिती नियमांची पुर्तता करून परवाना घेऊन बोली बोलुन खरेदी केल्याने व्यापारात स्पर्धा तयार होऊन दोन हजार रुपये पर्यन्त उच्चाकी भाव मिळाल्याने शेतकरयाचा आर्थिक फायदा होऊन शेतकरयाची आर्थिक लुट थांबली होती. मागील हंगामात थोडी उशिरा खरेदी सुरू झाल्याने सुरुवातीला ज्या शेतकरयानी मक्का विकली त्याना कमी भाव मिळाला हे वास्तव आहे. या हंगामात मक्का सोगणी चे दर देखील वाढले आहे कोरोणामुळे मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय शेतमजुर गावी गेले आहेत जास्तीचे पैसे मोजून मक्का सोगणी करणे मोठ्या प्रमाणावर पाऊस आदी संकटाचा सामना करत शेतकरी मक्का बाजारात विक्रीसाठी आणणार आहेत करीता लवकरात लवकर बाजार समिती अंतर्गत मक्का खरेदी सुरू केल्यास शेतकरयाना दिलासा मिळेल. मागील हंगामात एखादा अपवाद वगळता सर्व व्यापारयानी पारदर्शक व्यवहार पूर्ण केला आहे याही हंगामात अनेक व्यापारी बाजार समिती चा परवाने घेऊन मक्का खरेदी करण्यास इच्छुक आहे. यातून मोठ्या प्रमाणात बाजार समितीला कर रूपी फायदा होईल व व्यापारात स्पर्धा तयार होऊन शेतकरयाना उच्चाकी भाव मिळेल करीता आगामी होणारया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकीत लोणी खुर्द येथे उपबाजार अंतर्गत मक्का खरेदी सुरू करणे बाबतीत मा.सभापती व सर्व मा. संचालक मंडळ यांनी निर्णय घेऊन मक्का खरेदी सुरू करून मक्का उत्पादक शेतकरयाना दिलासा द्यावा असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान मक्का उत्पादक शेतकरयाचा हक्कासाठी वरील निर्णय न झाल्यास सर्व शेतकरयाना सोबत घेऊन कार्यालय कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापुर समोर तीव्र आंदोलन नाईलाजाने करण्यात येईल असा इशारा संतोष सुर्यवंशी यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक