पथविक्रेत्यांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा:उदय जराड प्रकल्प अधिकारी,

 Ank news Marathi team aurungabad, 

Deat, 17,09,2020,

गंगापूर पथविक्रेत्यांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा:उदय जराड प्रकल्प अधिकारी, 


मुख्य संपादक अशोक कराळे वैजापूर ॵरगाबाद, 


नगर पथ विक्री ते अनौपचारिक नागरी अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे , नगरवासी यांच्या आर्थिक कुवतीप्रमाणे स्वतः दारात वस्तू व सेवांची उपलब्धता वस्तू व सेवांची उपलब्धता सुचित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात covid-19 रोग सर्वत्र पसरलेला असल्यामुळे लोक डॉन मध्ये मध्ये पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला आहे यामुळे पथविक्रेत्यांच्या व्यवसाय बंद पडल्याने आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या रस्त्याच्या कडेला बसलेल्या फेरीवाला व पथविक्रेत्यांना उभारी देण्यासाठी नगरपरिषदे कडून केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना सुरू केली आहे. त्याचा लाभ संबंधित विक्रेत्यांनी घ्यावा, असे आवाहन. नगरपरिषद प्रकल्प अधिकारी अधिकारी जराड यांनी केले आहे. खालिल प्रमाणे योजनेचे उद्दिष्टे

 पथविक्रेत्यांना सहाय्य म्हणून खेळते भांडवल

रु. १०,०००/- कर्ज स्वरुपात उपलब्ध करुन देणे

 नियमित परतफेड करण्यास प्रोत्साहन देणे.

 डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन देणे.) 

 ( लाभार्थी पात्रता नियम ) 

(दिनांक २४ मार्च २०२० रोजी व त्यापूर्वीचे पथविक्रेते. • नगरपरिषद गंगापूरने प्रदान केलेल्या विक्री प्रमाणपत्र / ओळखपत्र असलेले

पथविक्रेते. . नगर परिषद ने प्रदान केलेल्या सर्वेक्षणात आढळलेले

परंतु त्यांना विक्री प्रमाणपत्र/ओळखपत्र दिले गेले नाही असे पथविक्रेते नगर परिषद ने केलेल्या सर्वेक्षणात जे पथविक्रेते वगळलेले आहेत

किंवा ज्यांना सर्व्हेक्षण पूर्ण झाल्यानंतर विक्री सुरु केली आहे आणि

त्यास नगर परिषद ने किंवा नगर पथविक्रेता समितीने शिफारसपत्र जारी केलेले आहे.. आसपासच्या

विकास / पेरी - शहरी/ग्रामीण भागातील पथविक्रेते नगर परिषद गंगापूरच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये पथविक्री करतात आणि त्यास नगर परिषद

गंगापूरने किंवा नगर पथविक्रेता समितीने शिफारसपत्र जारी केले आहे. असे. ) 

( आवश्यक कागदपत्रे ) 

आधार कार्ड, राशन कार्ड,मतदानकार्ड, डोमिसाईल प्रमाणपत्र, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन, (असल्यास)

 बाजार फी वसुली पावती, आधारलिंक मोबाईल नंबर

पासपोर्ट फोटो-१, बैंक पासबुक, इत्यादी कागदपत्रे लागेल.


करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जाहीर

केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक फिरत्या विक्रेत्यांचे

व्यवसाय बंद पडले होते. अशा फिरत्या विक्रेत्यांसाठी,

त्यांना उभारी देण्यासाठी नगरपरिषदे ने केंद्र शासन

पुरस्कृत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी

योजना सुरू केली आहे. योजनेत पात्र ठरणारे फेरीवाले

व पथ विक्रेते यांना सूक्ष्म पतपुरवठा करण्यासाठी राष्ट्रीय कृत बँकांच्या वतीने प्रति लाभार्थी 10 हजार

रुपये इतके कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.लाभार्थ्यांनी नियमित कर्जाची परतफेड केल्यास

तिमाही व्याज अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या पथ विक्रेत्यांना

व्यवसाय करणे सोपे होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

जाहीर केलेल्या धोरणानुसार ही योजना राबविण्यात

येत आहे. तरी लाभार्थी व्यक्तींनी या योजनेचा लाभ

घ्यावा असे आवाहन नगरपरिषद प्रकल्प अधिकारी उदय जऱ्हाड यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक