*वैजापूर भारतीय जैन संघटना स्मार्ट हेल्मेट ⛑️*

 Ank news Marathi team aurungabad, 

Deat, 15,09,2020,

मुख्य संपादक, अशोक कराळे वैजापूर ॵरगाबाद, 

वैजापुर भारतीय जैन संघटना स्मार्ट हेल्मेट ⛑️*





सदैव संकटकाळी मदतीचा हात देऊन समाजकार्यात अग्रसर राहणाऱ्या भारतीय जैन संघटनेने वाढत्या कोरोना संक्रमणाला रोखण्यासाठी रूपये पंच्चावन्न लाख कीमतीचे स्मार्ट हेल्मेट वैजापूर सारख्या शहरात एका दिवसासाठी आणुन त्याद्वारे नागरिक व व्यापाऱ्यांची अत्याधुनिक पध्दतीने स्मार्ट हेल्मेट थर्मल स्क्रीनिंग करण्यात आली. भारतीय जैन संघटना , वैजापूर नगर परिषद व उपजिल्हा रुग्णालय , वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश बोरनारे सर , नगराध्यक्ष सौ. शिल्पाताई परदेशी , मा.नगराध्यक्ष रविंद्र संचेती , तहसीलदार निखिल धुळधर , मुख्याधिकारी बी.यु.बिघोत , वर्धमान ना.सह.पत.चे चेअरमन हेमंत संचेती , वैजापूर तालुका किराणा व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष प्रकाशचंद बोथरा , मर्चंट बैंकेचे चेअरमन विशाल संचेती , भारतीय जैन संघटनेचे मराठवाडा सचिव निलेश पारख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अशोक धसे सर यांनी प्रास्ताविक केले व स्मार्ट हेल्मेट प्रकल्प प्रमुख प्रकाश कोचेटा यांनी हेल्मेट थर्मल स्क्रीनिंग बाबत माहिती दिली व अशोक कोठारी , राजेश संचेती , प्रफुल संचेती , महेश हिरण , रूपेश कुचेरीया , कीरण सारडा , संजय मालपाणी , अनिल संचेती , जितेंद्र संचेती व सहकाऱ्यांनी

कोरोना महामारीच्या सहा महिन्यांच्या कालावधीत भारतीय जैन संघटनेतर्फे रक्तदान शिबिर , कीराणा साहित्य व भाजीपाला वाटप , डॉक्टर आपल्या दारी द्वारे नागरिकांची मोफत तपासणी व मोफत औषधोपचार , परप्रांतीय नागरिकांची रहाण्याची खाण्यापिण्याची व जाण्याची व्यवस्था , कोरोना तपासणीसाठी सहकार्य , मास्क व सॅनिटायजर वाटप , प्लाझ्मा डोनेशन संमतीपञ आदी राबविलेल्या विविध आरोग्यसेवा व कार्याचे कौतुक केले. यावेळी डॉक्टर आपल्या दारी द्वारे मोफत रूग्ण तपासणी व औषधोपचारासाठी सहकार्य करणाऱ्या डॉक्टर व सहकाऱ्यांचा कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 

सर्व सन्माननीय नगरसेवक व सदस्य , नगर परिषद , तहसील व पंचायत समिति कर्मचारी , नागरिक व व्यापारी बांधव , विविध बॅक व पतसंस्थांचे कर्मचारी यांच्या तपासणीतुन वैजापूर शहरामध्ये सर्व अनलॉक झाल्यामुळे वाढत जाणाऱ्या कोरोना संसर्गला आळा घालण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला. ज्यात वैजापूर शहरामध्ये गर्दीच्या ठिकाणी *BJS स्मार्ट हेल्मेट* च्या माध्यमातून *5980* नागरिकांची शारिरीक तपासणी करण्यात येऊन उच्च तापमान असलेल्या *86* नागरिकांना त्यांची पुढील चाचणी करुन होणारा संसर्ग रोखण्यासाठी व परिवार व परिसराला सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक