मुंबई येथे होणारे आमरण उपोषनाची परिवहन आयुक्त यांनी तात्काळ. घेतली दखल . 9ऑगस्ट (क्रांती दिनी ) होणारे आमरण उपोषण आंदोलन तात्पुरते स्थगित.

 Ank news Marathi team 

Mumbai

Deat,11, 08,2020

नविन मुंबई प्रतिनिधी, कासम मुलाणी नवीन मुंबई, 

 दि.०९ ऑगस्ट २०२० (ऑगस्ट क्रांती दिन) पासून महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा चालक- मालकांचे आमरण उपोषनाची परिवहन आयुक्त यांनी तात्काळ दखल घेऊन आमरण उपोषण मागे घेण्याची केली लेखी विनंती,

9ऑगस्ट (क्रांती दिनी ) होणारे आमरण उपोषण आंदोलन तात्पुरते स्थगित.


मुंबई : महाराष्ट्रातील सुमारे २० लाखांहून अधिक ऑटोरिक्षा चालक - मालकांवर लॉकडाऊन कालावधीत ओढवलेल्या संकटाबद्दल रिक्षा टॅक्सी क्रांती संयुक्त कृति समिती, महाराष्ट्र राज्य च्या वतीने शासनाकडे माहिती दिलेली आहे. सध्याचे तीन चाकी सरकार हे तीन चाकांवर चरितार्थ चालविणाऱ्या सुमारे २० लाखांहून अधिक ऑटोरिक्षा चालक - मालकांबत गंभीर नाही.महाराष्ट्र्र शासनाचे लक्ष महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा चालक- मालकांच्या समस्यांकडे वेधण्यासाठी तथा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ऑटोरिक्षाचालकांच्या संमतीने रविवार, दि.०९ ऑगस्ट २०२० (ऑगस्ट क्रांती दिन) पासून प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी कार्यालये / तहसीलदार कार्यालये/प्रादेशिक तथा उप प्रादेशिक परिवहन कार्यालये / अन्य शासकीय कार्यालये येथे नाविलाजास्तव "शांततामय आमरण उपोषण" आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महाराष्र्ट राज्याचे परिवहन आयुक्त मा .शेखर चन्ने साहेबांनी शासकीय सुट्टी असतानाही रिक्षा टॅक्सी चालकांच्या मागण्या बाबत टास्क फोर्स उपसमिती मार्फत शासनाला शिफारस केली आहें व दिनांक 9 ऑगस्ट (क्रांती दिनी )संपूर्ण महाराष्ट्रात होणारे आमरण उपोषण माघे घावे अशी लेखी पत्राद्वारे विनंती केल्याने रिक्षा टॅक्सी संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या प्रतिनिधींची बैठक झूम AP द्वारे बैठक होऊन आमरण उपोषण आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला व महाराष्ट्र शासनाने रिक्षा टॅक्सी चालकांच्या प्रमुख मागण्या लवकरात लवकरच मान्य कराव्यात नाहीतर यापुढचे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संस्थापक /प्रभारी महाराष्ट्र राज्य कासम मुलाणी यांनी शासनाला दिला ..

आंदोलनाचे नेतृत्व रिक्षा टॅक्सी क्रांती संयुक्त समितीचे महाराष्ट्राचे प्रभारी कासम मुलाणी, श्रीकांत आचार्य , त्रिंबक स्वामी, डी. एम. गोसावी, सौ. आश्विनी मोरे हे करणार आहेत, अशी माहिती क्रांती रिक्षा टॅक्सी कृती समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक /प्रभारी कासम मुलाणी यांनी दिली , 

ऑटोरिक्षा चालकांच्या प्रमुख मागण्या :

१. प्रत्येक ऑटोरिक्षा चालकास लॉकडाऊन कालावधीतील प्रत्येक महिन्याकाठी किमान रु. ५०००/- ची आर्थिक मदत शासनाने द्यावी.

२.आत्महत्याग्रस्त ऑटोरिक्षाचालकांच्या प्रत्येक कुटुंबास रु. १० लाखांची मदत ताबडतोब शासनाने द्यावी.

३. ऑटोरिक्षाचालकांना शेतकऱ्यांप्रमाणे संपूर्ण कर्जमाफी मिळावी.

४.ऑटोरिक्षा चालकांना "कोविड योद्धा" म्हणून घोषित करून त्यांना रु.५० लाखांचे विमा कवच जाहीर करावे.

५. घोषित केलेल्या कल्याणकारी मंडळाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी.

कासम मुलाणी संस्थापक /प्रभारी क्रांती रिक्षा टॅक्सी संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक