वैजापूर लोणी येथील धोकादायक टान्सफार्मर दुरूस्ती करण्याची मागणी,,

Ank news marathi team aurungabad
Deat, 15,07,2020,


लोणी येथील धोकादायक टान्सफार्मर दुरूस्ती करण्याची मागणी

**लोणी प्रतिनिधी दादासाहेब तांबे, वैजापूर औरंगाबाद**


वैजापूर तालुक्यातील लोणी परिसरातील खळगा डीपी त्या डीपीला फ्यूज राहिले नसून त्या शेतकऱ्यांना टाकण्यात भीती वाटत आहे या डीपीकडे लवकरात लवकर प्रशासनाने लक्ष घालावे दुरूस्ती करण्याची मागणी शेतकरयानी केली आहे.

 ही डीपी धोकादायक बनली असुन वारंवार नादुरुस्त होत असल्याने विहीरीला पाणी असुन सुद्धा पिके वाळुन चालली आहेत. या डीपीकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष झालेले आहे . यामुळे शेतकरयाच खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहे.

पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदील झाले असुन आस्मानी संकट तर दुसरीकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष झाल्याने पाणी असुन लाईट सुरळीत चालत नसल्याने सुलतानी संकटाचा सामना शेतकरयाना करावा लागत आहे.

धोकादायक डीपी ज्या शेतकरयाच्या शेतात आहे त्या शेतकरयाला शेतीची कामें करतांना जीव मुठीत धरून काम करावे लागते आहे एखादा अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक