वैजापूरमध्ये 'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रमांतर्गत कोरोनाबाबत जनजागृती

Ank news marathi team aurungabad
Deat, 03,06,2020

मुख्य संपादक, अशोक कराळे वैजापूर औरंगाबाद

वैजापूरमध्ये 'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रमांतर्गत कोरोनाबाबत जनजागृती,


वैजापूरमध्ये 'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रमांतर्गत कोरोनाबाबत जनजागृती

औरंगाबाद, दिनांक 03 ग्रामीण भागांमध्ये कोरोना संसर्ग रोगाबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच ग्रामपंचायतीने याबाबत केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद औरंगाबादच्या वतीने 'जिल्हा परिषद आपल्या दारी' हा उपक्रम वैजापूर तालुक्यात यशस्वीरित्या राबविण्यात आला असल्याचे गट विकास अधिकारी डॉ. मोकाटे यांनी कळविले आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोदावले यांनी हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविण्याच्या सूचना दिलेल्या असून त्यानुसार तालुका वैजापूर येथे जिल्हा परिषदेचे संपर्क अधिकारी व पंचायत समिती स्तरावरील विभाग प्रमुख तसेच क्षेत्रीय अधिकारी यांनी तालुक्यातील 135 ग्रामपंचायतींना भेटी देऊन कोरोंना संसर्ग रोगाबाबत ग्रामपंचायतीने केलेल्या उपाययोजना, बाहेरून येणाऱ्या लोकांच्या नोंदी, चेक पोस्ट तसेच आरोग्य केंद्रमध्ये या रोगाबाबत केलेली तयारी, तपासणी याबाबत पाहणी केली.

 त्याचप्रमाणे कोरोना या रोगाबाबत ग्रामस्थांनी घ्यावयाची काळजी, याबाबत मार्गदर्शन केले.या बाबत सातत्य कायम ठेवावे, असे आवाहन डॉ राम लाहोटी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पा व स्व ), सहा. गटविकास अधिकारी विजय पंडित, विस्तार अधिकारी (पं) म्हस्के यांनी केले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक