Deat, 03,06,2020,
संपादक अशोक कराळे वैजापूर औरंगाबाद
वैजापूर तालुक्यातील भालगावहाद्दितून चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्यां 3 टॅक्टरवर
विरगाव पोलिसांची मोठी कारवाई,
विरगाव पोलीस स्टेशन, दिनांक 2 जून रोजी श्रीरामपूर तालुक्यातील वाळू तस्कर भालगाव जवळ गोदावरी नदी पत्रातुन चोरटी वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाले वरून आम्ही सदर माहिती मा sdpo श्री गोपाळ रांजनकर साहेबांना सांगून कारवाई साठी कर्मचारी पाहिजे बाबत कळविले असता त्यांचे 2 कर्मचारी विशाल पडळकर, आत्माराम पैठणकर ,आम्ही स्वतः, psi अरविंद गटकूळ, पो ना शिवनाथ सरोदे, संतोष सोनवणे अशांना मदतीला घेऊन डागपिंपळगाव कडून नदी तुन 3 km पायी जाऊन नदीत दबा धरून बसलो
काही वेळात नदीत थोडे थोडे अंतरावत 3 ट्रॅकर वाळू भरून श्रीरामपूर हद्दीकडे जाऊ लागले असता दोन दोन कर्मचारी अधिकारी यांच्या 3 टीम करून प्रत्येक टीम ने एक ट्रॅक्टर चा पाठलाग केला असता चालक ट्रकटर सोडून पळाले तेव्हा ट्रॅक्टर ताब्यात घेऊन चालविण्यासाठी स्थानिक ट्रॅक्टर चालक यांची मदत घेऊन पोलीस स्टेशन ला आणले ट्रॅक्टर चालक व मालक यांचेवर गुन्हे दाखल करून वाळू व ट्रॅक्टर असा 15 लाख 15 हजार चा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई मा पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील मॅडम, मा अपर पोलीस अधीक्षक श्री गणेश गावडे साहेब यांचे मार्गदर्शन खाली मा sdpo कार्यालय व ps विरगाव पोलीस यांनी केली आहे.
यापूर्वीचे रेकॉर्ड वरील 4 वाळू तस्कर यांना मा sdm वैजापूर श्री सानप साहेब यांचे कडे हद्दपार प्रस्ताव पाठवून लवकरच हद्दपार होतील याकरिता sdpo श्री रांजनकर सर व सपोनि विश्वास पाटील प्रयत्नशील आहेत.
Tags:
प्रशासकीय

