Ank news marathi team aurungabad
Deat, 27,06,2020
पावसाने दडी मारल्याने बळीराजा द्विधावस्थेत
प्रतिनिधी मुनीर पठाण अजिंठा, सिल्लोड, औरंगाबाद,
सिल्लोड तालुक्यातील अनेक गावांत सुरु वातीला चांगला पाऊस झाल्याने बळीराजांच्या चेहऱ्यावर समाधान होते. त्यामुळे खरीप हंगामासाठी सज्ज होऊन बळीराजा मशागत करून पेरणीला लागला; परंतु नंतर पावसाने दडी मारल्याने बळीराजांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
रब्बी हंगामातील आलेला कटू अनुभव बाजूला सारून बळीराजाने यंदाच्या खरीप हंगामासाठी आपली कंबर कसली आहे. सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे अजिंठा, अनाड, बाळापूर, पिंपळदरी, पानस,डिग्रस, शिवणा,धोत्रा, गोळेगांव, आदी भागातील शेतकरीवर्ग खरीप हंगामासाठी सज्ज झाला.
मध्यंतरी थोडा पाऊस उघडल्याने बळीराजांच्या पेरण्या मध्यावर आल्या असताना पावसाने दडी. मारल्याने बळीराजांच्या कल्पनाना फाटा निर्माण झाला आहे.पेरण्या आटोपल्या असून, पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. कोरोना, अस्मानी, सुलतानी संकटांनी ग्रामीण भागातील जनता त्रासून गेली आहे.
त्यात मोठ्या कष्टाने खरीपाची तयारी करून जास्त कसे उत्पन्न घेता येईल.यंदा सुरु वातीला चांगला पाऊस झाल्याने पाण्याची काळजी मिटली या आशेवर बळीराजाने सोयाबीन, भुईमूग, मका, कापुस, ज्वारी आदी बियाणे खरेदी करून पेरणी केली.पावसाने पाठ दाखवल्याने खरीप हंगामाचे भांडवल वाया जाते की काय याची भीती बळीराजाला वाटू लागली आहे. या परिस्थितीतही उधार- उसनवारी करून बियाणे, खते खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.
परिसरात खरीप हंगामातील मका, सोयाबीन, कापुस पिकांच्या लागवडी झाल्या आहेत. मक्याचे अंकुर उगवले असून, सोयाबीनच्या पेरण्याही झाल्या आहेत. मात्र, अद्याप सोयाबीन उगवले नसल्याने शेतकरी चिंतित आहे. आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने व वाढत्या उष्णतेने जमिनीची ओलही कमी होत चालल्याने कापुस, मका, सोयाबीन पीक धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Tags:
शेतकरी