51 ते 70 वयोगटातील सर्वाधिक मृत्यू या वयोगटातील तब्बल 109 रुग्ण तरुण हायरिस्क बाहेर79 महिला 127 पुरुष रुग्ण दगावले,

Ank news marathi team aurungabad
Deat, 25,06,2020

औरंगाबाद,जिल्हा प्रतिनिधी, फिरोज पठाण औरंगाबाद

51 ते 70 वयोगटातील सर्वाधिक मृत्यू
या वयोगटातील तब्बल 109 रुग्ण
तरुण हायरिस्क बाहेर79 महिला 127 पुरुष रुग्ण दगावले,

औरंगाबाद,जून महिना सुरू होताच शहर व जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे रुग्णसंख्या वाढी पाठोपाठ मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे यात 51 ते 70 वयोगटातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.


औरंगाबाद शहरामध्ये 15 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला काही रुग्ण आढळून आले होते 5 एप्रिल रोजी सातारा परिसरातील एका कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला होता हा शहरातील कोरोनामुळे झालेला पहिला मृत्यू आहे एप्रिल-मे महिन्यातही कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून बाधितांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली तर मृत्यूचे प्रमाणही वाढले जून महिन्याचा एक तारखेपासून दररोज घाटी रुग्णालय आणि शहरातील विविध खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे दिवसाला चार ते आठ रुग्णांचा मृत्यू होत आहे 22 जून पर्यंत सर्व जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 206 वर गेली होती यामध्ये 79 महिला आणि 127 पुरुष रुग्णांचा समावेश आहे,
तरुण धोक्याबाहेर...
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यामध्ये शून्य ते 20 वयोगटातील दोन आणि 21 ते 30 वयोगटातील दोन रुग्णांचा समावेश आहे, तसेच 31 ते 40 या वयोगटातील 18 जणांचा करणामुळे मृत्यू झाला आहे.

ज्येष्ठ नागरिक तसेच हायपर टेन्शन ब्लडप्रेशर, मधुमेह, हृदयविकार किडनीशी संबंधित आजार यासह इतर आजार असलेल्या व्यक्तीना करू नका धोका हा सर्वाधिक आहे तरुण वर्गाची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने या वयोगटातील रुग्ण लवकर बरे होतात त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजार असलेल्या नागरिकांनी जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

वयोगट। मृत्यू झालेल्याचीसंख्या
शून्य ते 20 02
21 ते 30 02
31 ते 40 18
41 ते 50 29
51 ते 60 55
61 ते 70 54
71 ते 80 35
81 ते 90 09
92 ते। 100 02
एकूण 206

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक