Ank news marathi team
Nashik
Deat, 02,05,2020
मुख्य संपादक, अशोक कराळे,
आम्ही जातो आमुच्या गावा,
परप्रांतीय मजुरांना निरोप देताना पालकमंत्री भावूक उत्तर प्रदेशचे ८४७ मजूर विशेष रेल्वेने घराकडे रवाना,
नाशिक परप्रांतीय मजुरांची नाशिकच्या प्रशासनाने कुटूंबाप्रमाणे काळजी घेतली. गेला दीड महिना सर्व यंत्रणा या मजुरांसाठी, त्यांच्या मुलाबाळांसाठी झटत होती.
त्यामुळेच तर आज रेल्वे सुटतांना त्यांच्या डोळयात पाणी होते. गाडी सुटतांना या प्रवाशांनी महाराष्ट्र सरकार की जय, जय महाराष्ट्र, अशा घोषणा देवून एकप्रकारे नाशिकच्या प्रशासनालाच धन्यवाद दिले, असे मत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह़याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
या प्रवाशांना निरोप देताना पालकमंत्री देखील भावूक झाले होते.
लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर मुंबई आणि उपनगरांतून पायी उत्तर प्रदेशकडे निघालेल्या या मजुरांना इगतपुरी, नाशिक येथे थांबवून निवारागृहात त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व मजुरांना आज विशेष रेल्वेने उत्तर प्रदेशला रवाना करण्यात आले . या गाडीला निरोप देण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील, सहायक जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे, तहसीलदार परमेश्वर कासुळे उपस्थित होते.
नाशिक शहरातील विविध निवारागृहात गेल्या दीड महिन्यापासून थांबून असलेल्या उत्तर प्रदेश येथील ८४७ कामगार, मजुरांना शनिवारी सकाळी नाशिक येथून विशेष रेल्वेने उत्तर प्रदेश लखनऊला रवाना करण्यात आले. यामध्ये मुंबई, नालासोपारा, कल्याण, नेरूळ येथील मजूर होते.
श्री. भुजबळ म्हणाले, मुंबई येथून पायी चालत आलेल्या या परप्रांतीय मजुरांमध्ये लिंबू पाण्याचा व्यवसाय करणारे, दूध विक्रेते, वडापावचे व्यावसायीक होते. लॉकडाउन जाहीर होताच हे सगळे पायीच गावाकडे निघाले होते. मात्र त्यांना नाशिक आणि इगतपुरी येथील निवारागृहात थांबवून तेथे त्यांची राहण्याची सोय करण्यात आली होती. गेल्या दीड महिन्यात त्यांना दोन वेळेचे जेवण, चहा, नाश्ता अस सगळे पुरविले जात होते. या सर्वांची वेळोवळी आरोग्य तपासणी देखील करण्यात आली. त्यांच्या मुलांना लसीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे यामध्ये जे अजूनही कोरोना संशयित वाटत होते, त्यांना नाशिक येथेच थांबविण्यात असून त्यांच्या आरोग्याची काळजी आपण घेत आहोत. उर्वरितांना आज या विशेष रेल्वेने सोडण्यात येत आहे. गाडीतही त्यांना सुरक्षित वावर ठेवत बसविण्यात आले आहे. सोबत दोन वेळेचे जेवण, पिण्याचे पुरेसे पाणी देण्यात आले आहे.
*कौतुकाची थाप*
गेला दीड महिना जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील, आरोग्य यंत्रणा यांनी या परप्रांतीय मजुरांची खूप काळजी घेतली, अशा शब्दात पालकमंत्री श्री भुजबळ यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणेच्या कामाचे कौतुक केले.
*हे संकट लवकर दूव होवो*
या सर्व परप्रांतियांच्या चेहऱ्यावर आज घरी जाण्याचा आनंद ओसंडून वाहत होता. गौरवाची आणि अभिमानाची बाब म्हणजे रेल्वे सुटली तेव्हा त्यांनी मोठमोठयाने महाराष्ट्र सरकार की जय, जय महाराष्ट्र अशा घोषणा दिल्या. आपण अपेक्षा करू हा कोरोना लवकरच महाराष्ट्रातून, भारतातून आणि संपूर्ण जगातून नाहीसा होईल, असा आशावादही पालकमंत्री भुजबळ यांनी व्यक्त केला.
मांढर आत्मविश्वास दुणावला जिल्हाधिकारी सूरज मांढरे
नाशिक मधून आज उत्तर प्रदेश लखनऊ येथे जाण्यासाठी दुसरी रेल्वे गाडी रवाना करण्यात आली. साडेआठशे नागरिकांना घेऊन ही गाडी निघाली आहे. जाताना त्यांना पाण्याचे बॉटल्स जेवण-खाण बिस्किट सर्व काही देऊन रवाना करण्यात आले. रेल्वे सुटल्यावर या उत्तर प्रदेशातील मंडळींनी जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सरकार जिंदाबाद असा घोषणा नाद केला. देश म्हणून आपण या संकटाचा मुकाबला करू शकू याबद्दल आत्मविश्वास आज दुणावला असल्याचे मत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केले.
Tags:
सामाजिक



