वैजापूर किरणा सामनाच्या आड अवैध तंबाखू सिगरेट तस्करी किंवा वाहतुक करणारा पिकपवर कडक कारवाई,

 Ank news marathi team aurungabad
Deat, 16,05,2020,

संपादक अशोक कराळे वैजापूर औरंगाबाद

वैजापूर किरणा सामनाच्या आड अवैध तंबाखू सिगरेट तस्करी किंवा वाहतुक करणारा पिकपवर कडक कारवाई,

दिनांक 15.5.20 रोजी मा. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील मॅडम, मा. अपर पोलीस अधीक्षक गणेश गावडे सर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वैजापूर गोपाळ रंजनकर सर यांच्या आदेशाने ,मा. जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांच्या जमावबंदी व संचारबंदी आदेशाची अमलबजावणी करण्यासाठी तसेच नाकाबंदी कडक करण्यासाठी आम्ही स्वतःसहा.पो.नि.विश्वास पाटील, ,पो उप.नि. अरविंद गटकूल, पो ना.1608 प्रशांत दांडेवार असे विरगाव हद्दीत पेट्रोलिंग करत नाउर चेकपोस्ट येथे 12:00 वाजता च्या सुमारास गेलो
.




तेथे नाकाबंदी कर्मचारी पीसी 1647 तायडे, होमगार्ड 2116 दारुटे, 2119 अनर्थे यांचे सोबत नाउर चेकपोस्ट येथे थांबून अहमदनगर जिल्हा व औरंगाबाद जिल्हा येथून येणारी जाणारी वाहने तपासून सोडत असताना 13:00 वाजताच्या सुमारास अहमदनगर हद्दीतून एक पांढऱ्या रंगाचे पिक अप वाहन क्रमांक mh 20 bt 2676 औरंगाबाद हद्दीत प्रवेश करत असताना चेकिंग करण्याच्या उद्देशाने नाउर चेक पोस्ट येथे थांबवले.

 त्यातील इसम याना आतमध्ये काय अहे अशी विचसरण केली असता त्यानी साखरेचे पोते आहेत असे सांगितले, त्यावर त्याना पोत्यांचे बिल् दाखवा अशी विचारणा केली असता त्यानी बिल दाखवण्यास असमर्थता दाखवलेवर आम्हला गाडीबद्दल शंका आल्याने सदर पिकअप त्यातील इसम नामे 1)चांद पशु सय्यद वय 50 वर्ष 2) पुरुषोत्तम कन्हैय्यादास बैरागी वय 35 वर्ष रा वैजापूर यांच्या सह ps विरगाव येथे घेऊन येऊन पिक अपची 2 पंच याच्यासमक्ष पाहणी केली असता

 त्यात साखरेच्या 27 गोण्याखाली गाय छाप तंबाकू चे 10 गोण्या, एकूण किंमत 80,000/-,तसेच ब्रिस्टॉल स्पेशल फिल्टर चा एक बॉक्स किंमत रुपये 70,400/-
 मिळून आले,

पिक अप वाहनसह गायछाप गोण्या तसेच ब्रिस्टॉल सिगारेट बॉक्स असा एकूण 6,50,400/-रु चा मुद्देमाल दोन पंच यांच्यासह तापासकमी जप्त केला आहे, साखर पोते व इतर किराणा त्यांच्या ताब्यात दिले आहेत. गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.उप.नि.श्री,अरविंद गटकूळ व पथक करत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक