भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आज रात्री ८ वाजता देशवासीयाशी संवाद साधून, करणार मोठी घोषणा,

Ank news marathi team aurungabad
Deat, 12,05,2020

 मुख्य संपादक अशोक एन कराळे वैजापूर औरंगाबाद महाराष्ट्र,

 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आज रात्री ८ वाजता देशवासीयाशी संवाद साधून, करणार मोठी घोषणा,


  पंतप्रधान मोदी आज रात्री देशवासीयांशी संवाद साधणार; मोठी घोषणा होणार? पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे देशाचं लक्ष नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपतो आहे. मात्र कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी आज काय बोलणार, कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोरोना संकटातून मार्ग काढण्याच्या दृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. देशात लागू असलेला लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपणार आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झालेली चर्चा आणि त्या चर्चेचा एकंदर सूर पाहता देशातला लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. त्याची घोषणा पंतप्रधान मोदी आज करू शकतात. लॉकडाऊनच्या पहिल्या तीन टप्प्यांपेक्षा चौथा टप्पा वेगळा असेल, अशी चर्चा आहे. यामध्ये राज्य सरकारांना अधिकचे अधिकार मिळू शकतात

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक