कोरोला सिरीयसली घ्या!

Ank News marathi team
Aurungabad
Date:28/04/2020

एक दिवस 
अचानक ताप येतो
घसा दुखू लागतो
खोकला सुरू होतो
श्वास घ्यायला त्रास होतो
कोविड टेस्ट केली जाते
तीन दिवस टेंशनखाली जातात
टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर...
रिपोर्ट थेट महापालिकेकडे जातो
रिपोर्टवरून हॉस्पिटल दिले जाते
एक अँम्ब्युलन्स  सोसायटीत येते
सगळेजण खिडकीतून तुमच्याकडे पाहतात
काही मनापासून शुभेच्छा देतात
काही मनातून  हसतात
अँम्ब्युलन्सचे कर्मचारी तुम्हाला सोबत कपड्याची एक बॅग घ्यायला सांगतात...
आता तुमचे घरचे तुम्हाला डोळे भरून पाहतात


तुमचे अश्रूंनी भरलेले डोळे खूप बोलतात
चला लौकर आत बसा... कर्मचारी तुमच्यावर खेकसतो
धाडकन दरवाजा बंद होतो
अँम्ब्युलन्स  सायरन देत निघते
सोसायटी सील केली जाते
चौदा दिवस तुम्हाला बेडवर पोटावर झोपवले जाते


अगदी साधं जेवण जेवण्यापुरती मुभा मिळते


टीव्ही मोबाईल वगैरे काही नाही
दिवसरात्र तुम्हाला समोरच्या भिंतीवर तुमच्या आयुष्याचा चित्रपट दिसतो
तुम्ही बरे झालात तर बरं
तीन टेस्ट निगेटिव्ह आल्या तरच तुम्हाला घरी घेऊन येतात
पण... 


उपचारा दरम्यान तुम्ही देवाघरीही जाऊ शकता
तसे गेलात तर...


तुमचा देह प्लास्टिकमध्ये रॅप करून थेट कब्रस्तानात पाठवतात...
घरच्यांना दीदार नाही..
कब्रस्तानात कसलेही विधी नाहीत..
एक डेथ सर्टिफिकेट तुमच्या कुटुंबियांना देतात..

बिच्चारा गेला.



तेव्हा उगाच घराबाहेर पडू नका. 
घरातच थांबा.. मोह टाळा. 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक