ank news marathi team,
सिल्लोड,
Deat,11,05,2025
पिंपळगाव परिसरात वाढलाचा कहर.झाडें कोसळली, पत्रे उडाली,मंदिराचा कळस पडला पोल वाकली,
जीवितहानी कुठेच नाहीपाच तास लाईट गुल
पिंपळगाव पेठ-प्रतिनिधी,प्रभाकर दांडगे,छ, संभाजीनगर,
सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ सह परिसरातील भवन, वरुड, तांडाबाजार, गव्हाली, बोरगाव कासारी, चिंचखेडा, नील्लोड, कायगाव, तलवाडा केऱ्हाळा, परिसरातील दुपारी वादळी वाऱ्यांसह झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले. झाडे पडली, आब्यांची गळ झाली, पिके भुईसपाट झाली, वीटभट्टी चालकांची धांदल उडाली. यामध्ये झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. परिसरात रविवारी दुपारी सुरु झालेल्या अवकाळी पावसाने दाणादाण उडवली. यात तीनच्या दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्याने हजेरी लावली वाऱ्याच्या वेगाबरोबरच पावसाने जोरदार बरसण्यास सुरुवात केली. वाऱ्याचा वेग इतका जोरदार होता की पिंपळगावातील देवीच्या मंदिरचा कळस तुटून पडला झाडाच्या फ़ांद्या तुटून पडल्या जीर्ण असलेल्या झाडांचे मोठे नुकसान झाले तर काही शेतकऱ्यांची शेतात रचून ठेवलेली वैरण उडून गेली.पिंपळगाव येथील महादू मोरे यांच्या घरावरील पत्रे उडाली असून त्यांच्या संसारुपयोगी वस्तू पाण्याय भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे.रब्बी हणागामातील सोंगलेली मकाचेही मळणी अभावी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
काहींच्या शेतातील गोठ्यातील टिन पत्रे उडाले. यासह अनेक झाडे उन्मळून पडली. तर काही झाडांच्या फांद्या तुटल्या. काही फांद्या व झाड ईलेक्ट्रीक पोलवर पडले. रस्त्यावरील लावलेले अनेक झाडं कोसळलेत त्यात सिल्लोड पिंपळगाव वरुड रस्ता काही तास बंद होता मात्र जेसीबीच्या सह्याने रस्ता मोकळा करण्यात आला.
----------------
थरार... 25 वर्षात असे वादळ बघितले नाही !
वादळाचा तडाखा इतका होता की वादळाने टिनपत्रे, झाडांच्या फांद्या तसेच अनेक वस्तू आपल्या कवेत घेतल्या. याचवेळी पिंपळगावातील मारोती मंदिरावर काही जण बसले होते वादळापासून वाचण्यासाठी त्यांनी मंदिराचा आसरा घेतला. अनेक टिनपत्रे उडताना त्यांनी बघितले. तसेच त्यांच्या डोळ्या देखत मनःदिराजवळील डीपीवर झाड पडताना त्यांनी बघितली तर तांडाबाजार वरुड येथील महावीतरांचे पोल कोसळले हे वादळ इतके भयंकर होते की अजून अर्धा तास चालले असते तर जीवितहानी झाली असती गेल्या 25 वर्षात असेल वादळ बघितले नाही अशी आपबीती मंदिरावर बसलेल्या वयस्कर मंडळी यांनी सांगितली
लाईट गुल, अर्धे गाव अंधारात.
वादळी वा-यामुळे इलेक्ट्रीक पोलवर फांद्या व झाड कोसळले. त्यामुळे अनेक ईलेक्ट्रीक पोल वाकलेत. तर काही सिमेंटचे पोल तळातून तुटले. याचा ईलेक्ट्रीक सप्लायवर परिणाम झाला. वातावरणात आधीच चांगलाच उकाडा होता. त्यातच लाईट गेल्यामुळे परिसरात उकाड्यातच रात्र काढावीलागली तर काही गावातील लाईट महावितरण च्या कर्मचाऱ्यांनी वायरी जोडून जीव पुरवठा चार तासानंतर सुरळीत केला. मात्र काही भागातील लाईट अद्यापही गुल आहे.
--------------
Tags:
नैसर्गिक

