या दिवशी लाडक्या बहिणींना मिळणार तीन हजार रुपये महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे

ank news Marathi team Mumbai Deat 03.03.2025 ank news Marathi online संपादक अशोक कराळे टाकळी सागजकर वैजापूर छ संभाजीनगर . या दिवशी लाडक्या बहिणींना मिळणार तीन हजार रुपये महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे
राज्य सरकारने महिला दिनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी दिली आहे. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचा हफ्ता एकत्रित देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, ८ मार्च रोजी प्रत्येक लाभार्थीच्या खात्यात तीन हजार रुपये जमा केले जातील. या प्रक्रियेला ५ मार्चपासून सुरुवात होईल आणि हफ्त्यांचे पैसे हळूहळू खात्यात येण्यास सुरुवात होईल. महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देत सांगितले की, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना आर्थिक मदतीचा लाभ तातडीने मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता महिला दिनानिमित्त महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार आहे. मात्र अनेक अपात्र महिलांना यामधून वगळण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक