भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनोज जरांगे पाटलांच्या २३ डिसेंबरच्या ऐतिहासिक इशारा सभेस उपस्थित राहा-दिलिप गोरे*

Ank news marathi team bhid Deat,23.12.2023 Ank news marathi live parthinidhi. Ashok Karale Patil sagajkar *भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनोज जरांगे पाटलांच्या २३ डिसेंबरच्या ऐतिहासिक इशारा सभेस उपस्थित राहा-दिलिप गोरे*
बीड - गेल्या पन्नास वर्षापासून मराठा समाजाच्या मुला-मुली चे भविष्य अंधारात गेले असुन अनेक राजकीय पक्षाने मराठा समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून सत्तेचा उपभोग घेतला असुन यात फक्त मराठा समाजा उध्वस्त झाला असुन शेतकरी बांधव आणि सुशिक्षित तरुणांने महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर आत्महत्या केल्या असून आत्महत्याचे हे सत्र आज पण चालु असुन हा कलंक कायमस्वरूपी मिटविण्यासाठी बीड जिल्हाचे भुमीपुत्र मनोज जरांगे पाटलांना गेल्या पाच महिन्यांपासून जीवाचे रान करून समाजाला एकत्र केले असून भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनोज जरांगे पाटलांच्या २३डिसेबरचया बीड येथील ऐतिहासिक इशारा निर्णायक सभेस लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बीआरएस बीड जिल्हा समन्वयक तथा माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. प्रसिद्धी पत्रकात दिलिप गोरे म्हणाले की, मराठा समाजातील तरूण आज दिशाहीन झाला असून शिक्षण असताना सुद्धा नौकरी मिळत नाही या नैराश्यमुळे मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत असुन तर दुसरीकडे शेतकरी आत्महत्या करीत आहे.. देशाच्या इतिहासात इतके संकट कुठल्याही समाजा वर आले नसुन मराठा समाज गेल्या पन्नास वर्षापासून यातुन जात आहे.. महाराष्ट्र अनेक राजकीय पक्षाने मराठा समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून सत्तेचा उपभोग करून घेतला.पण मराठा समाजाला आरक्षण दिले नाही.. मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आता मराठा आरक्षणाची निर्णायक लढाई होत असुन बीड च्या इशारा सभेतुन मराठा समाजाला नवी दिशा मिळणार असुन मराठा समाजसह सर्व जाती धर्माच्या माता भगिनी, शेतकरी, शेतकर मंजुर, युवक, युवती आदीने या ऐतिहासिक सभेचे साक्षीदार व्हावे असे आवाहन बीआरएस बीड जिल्हा समन्वयक तथा माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे यांनी केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक