1 डिसेंबरपासून सुरु होणार इयत्ता पहिलीपासूनचे वर्ग; शासनाने जारी केली मार्गदर्शक तत्वे.

Ank news marathi team

Aurangabad,

Deat,30.11.2021

मुख्य संपादक,अशोक कराळे वैजापूर औरंगाबाद,

1 डिसेंबरपासून सुरु होणार इयत्ता पहिलीपासूनचे वर्ग; शासनाने जारी केली मार्गदर्शक तत्वे.



राज्यात 1 डिसेंबर रोजी इयत्ता 1 पासूनचे वर्ग सुरु होत आहेत. महामारीच्या काळात सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी समान प्रवेश मिळावा यासाठी शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार केला जात असल्याचे, शिक्षण मंत्रे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. या शाळा सुरु होताना काही निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे. त्यानुसार, मुलांसाठी मास्कचा वापर अनिवार्य असेल. कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी, शिक्षक/कर्मचाऱ्यांना लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांनाच आवारात परवानगी असेल. शाळांनी शिफ्ट/पर्यायी दिवसांमध्ये काम करावे. ठराविक वेळेत केवळ 15-20 विद्यार्थीच वर्गात उपस्थित राहतील याची खात्री करावी. प्रत्येक बेंचवर एकच विद्यार्थी बसेल. शाळेची वेळ दररोज 3-4 तासांपर्यंत मर्यादित असावी. शाळांमध्ये कोणत्याही सांस्कृतिक किंवा क्रीडा कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक