Ank news marathi team
Yaijapur
Deat,23.07.2021
लोणी खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रास उपसभापती यांची भेट
प्रतिनिधी लोणी खुर्द ,दादासाहेब तांबे
वैजापुर पंचायत समिती उपसभापती योगिता आनंद निकम यांनी दि.२२ रोजी लोणी खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देवून आरोग्य केंद्रातील समस्या जाणून घेतल्या व आरोग्य केंद्रात कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया झालेल्या महिलांशी तब्बेतीची व सुविधेविषयी चर्चा करत रुग्णांना चहा बिस्किट वाटप केले यावेळी वैद्यकिय अधिकारी आर.बी.मुरमूरे यांनी आरोग्यकेंद्राच्या वतिने उपसभापती निकम यांचा सत्कार केला यावेळी वैद्यकिय अधिकारी मुरमूरे उपसरपंच आप्पासाहेब जाधव, रामभाऊ अवचिते,प्रा.आनंद निकम, राहूल जाधव, राधाकृष्ण सोनवणे, रुग्णवाहिका चालक काकडे हे हजर होते
आरोग्य केंद्रातील समस्या लवकरच सोडवल्या जातील असा विश्वास उपसभापती योगिता निकम यांनी दिला समस्या सुटत नसेलच तर वेळ पडली तर जि.प.औरंगाबाद येथे स्वत: उपोषण करेल असेही यावेळी सांगितले


