Ank news marathi team
Yiajapur,
Deat,21.07.2021.
खंडाळा येथे चोरट्यांनी पळविल्या शेळ्या मेंढपाळांत घबराटीचे वातावरण.
लोणी खुर्द .प्रतिनिधी.दादासाहेब तांबे.
वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे अनेक मेंढपाळ कुटुंब रहात असुन दि.१९ रोजी रात्री भुरट्या चोरट्यांनी मेंढपाळ पंढरीनाथ एकनाथ जानराव,यांच्या वाड्यातुन ३ शेळ्या लंपास केल्या आहेत.त्यामुळे येथील शेळी मेंढी पालन करणारे धनगर समाज कुटुंब घाबरले आहेत खंडाळा येथील मेंढपाळ हे उन्हाळ्यात आठ महिने रानोमाळ भटकंती करुण पावसाळ्यात चार महिने आपल्या गावी रहातात परंतू शेळ्या चोरी गेल्याने त्यांना रात्र भर जागी राहुन पहारा द्यावा लागत आहेत..
घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधवर,बिटजमादार हुकुंमसींग डांगर,महेश बिरोटे, यांनी पहानी करुण पंचनामा केला
फोटो.. शेळ्या चोरी गेलेल्या वाड्याची पहानी करताना पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधवर, बिटजमादार हुकुंमसींग डांगर, महेश बिरोटे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जानराव,



