Ank news marathi team
Yaijapur
Deat,25.05.2021
महालगाव सर्कल प्रतिनिधी ,सचिन मोईन वैजापुर औरंगाबाद,
निर्मला इन्स्टिट्यूट तर्फे चोरवाघलगाव मध्ये सुमारे 64 कुटूंबांना किराणा सामान वाटप.
वैजापूर तालुक्यातील चोरवाघलगाव येथे 64 गरीब कुटूंबांना निर्मला इन्स्टिट्यूट तर्फे कोरोना काळात किराणा सामान वाटप करण्यात आले. त्यात तेल, साखर, पोहे, शेंगदाणे, डाळ आदींसह साहित्याचे वाटप करण्यात आले.हा उपक्रम निर्मला इन्स्टिट्यूट तर्फे अनेक गावांत राबवला जात असून सुमारे एक हजार ते पंधराशे लोकांना कोरोना काळात किराणा सामानाचे वाटप करण्यात येत आहे.
यावेळी निर्मला इन्स्टिट्यूटचे इरफान सय्यद, छाया बंगाल, सुनीता मनोरे, सरपंच कैलास सातपुते, उपसरपंच दादासाहेब मोईन, संजय वमने, चेअरमन सुनिल मोईन आदींसह गांवकरी उपस्थित होते.




