ank News Marathi team
Aurungabad
Deat, 09.04.2021
वैजापूर आरोग्य सेवेचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार
प्रा.आमदार.रमेश पाटील बोरनारे,लोणी खुर्द येथे आमदार निधीतून रूग्णवाहीकेचे लोकार्पण,
लोणी खुर्द ( प्रतिनिधी ) दादासाहेब तांबे लोणी वैजापूर औरंगाबाद,
वैजापूर तालुक्यात सध्या च्या कोरोणा काळात आरोग्य सेवा महत्त्वाची असुन आरोग्य सेवेचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याची ग्वाही प्रा.आ.रमेश बोरणारे यांनी लोणी खुर्द येथे दिली .प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी खुर्द येथे आमदार निधी मधून नवीन सर्व सुविधायुक्त रुग्णवाहिका लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते तालुक्यात आतापर्यंतच दोनशे कोटी रुपयांचे विकास कामे मंजूर करून घेतली कोरोना परिस्थितीत देखील तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत कुठे निधी कमी पडू दिला नाही असे ते म्हणाले तसेच वैजापूर तालुक्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आमदार निधी मधून रुग्णवाहिका देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले
मा.आ.आर .एम.वाणी यांच्या शिकवणी प्रमाणे कुणावर टीका न करता मला लोकांनी एक लाख मतांनी निवडून दिले असल्याने जनसेवक म्हणुन लोकांचे छोटे मोठे प्रश्न सोडवणे हे माझे कर्तव्य आहे .असे त्यांनी सांगितले याप्रसंगी शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे , उपतालुका प्रमुख कल्याण पा जगताप,कृ उ बाजार समिती सभापती भागीनाथ मगर माजी सभापती संजय निकम ,रामहरी जाधव ,शिवसेना उपतालुकाप्रमुख गोरक आहेर, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष संतोष सुर्यवंशी, उपविभाग प्रमुख अंबादास खोसे ,भिका पाटील सोमासे ज्ञानेश्वर तांबे सोमनाथ तांबे निलेश निकम राजू निकम, राजेंद्र निकम ,दादासाहेब तांबे ,संतोष निकम, सरपंच अवचिते ,उपसरपंच आप्पासाहेब बाळासाहेब जाधव ग्रामपंचायत सदस्य राधाकृष्ण सोनवणे ,भाऊसाहेब जाधव राजेंद्र जगदाळे सुभाष जाधव पंढरीनाथ पवार भिमराव जधव गौतम नाना राजेंद्र चव्हाण, तातेराव आहेर बाबाजी ,पी आर नाना जाधव सोपान भाऊ जाधव मदन राव जाधव माजी सरपंच सर्जेराव जाधव हट्टेसिंग चौधरी निजाम बाई सय्यद मुख्याधिकारी श्री मुर्मुरे डॉक्टर व सहकारी रुग्णवाहिकेचे चालक काकडे मामा सर्व ग्रामपंचायत सदस्य आरोग्य विभाग कर्मचारी,पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, पंचायत विभाग प्रशासन,गावकरी आदी उपस्थित होते.
Tags:
आरोग्यविषयक



