ank News Marathi team,
yavala,
Deat, 16.04.2021
ank News Marathi मुख्य संपादक अशोक कराळे,वैजापूर,औरंदाबाद,
अबब,येवला तालुक्यातील राजापूर येथे कोरोनाने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू,
राजापूर येथे कोरोनाने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने राजापूर व गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे राजापूर येथील स्वस्त धान्य दुकानदार अरुण माधवराव जाधव यांच्या इथे त्यांच्या आई मालनबाई जाधव, या आजारी असल्याने त्यांच्या दोन बहिणी मुंबई येथून आईला भेटण्यासाठी राजापूर येथे आले असता त्यांना त्रास होऊ लागला असता त्यांना दवाखान्यात नेले व त्या कोरोना गस्त निघाल्याने जाधव यांच्या कुटुंबात एक एकाला त्रास जाणवला सुरुवात झाली व एक हप्तात जाधव कुटुंबातील स्वतः अरुण जाधव, मुलगा अमित जाधव ,आई,मालनबाई जाधव,व अरुण जाधव यांच्या दोन बहिणी शोभासातदिवे,छाया वाघ, यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यांना मागील वर्षी अरुण जाधव त्यांच्या पत्नीचे निधन झाले व त्या दुःखातुन सावरत नाही तर वर्ष होत नाही तोच लगेच एकाच कुटुंबातील पाच जण दगावल्याची घटना घडल्याने राजापूर व परिसरात व तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे जाधव यांना एक मतिमंद मुलगा असून या मुलाचा संगोपन करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अरुण जाधव यांच्या कुटुंबातील कर्ता मुलगा आमीत जाधव हाच एकमेव या कुटुंबाचा आधार होता. मात्र नियतीचा खेळ हा फार अवघड असल्याने अमितचया पत्नीचा संसार उद्धवस्त झाला सारखे झाले आहे. राजापूर गाव मोठ्या संकटात सापडल्याने जाधव कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. राजापूर येथे दररोज रूग्ण वाढत असल्याने राजापूर येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध झाली नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे व पॉझिटिव आलेले व्यक्ती हे विलीनीकरण कक्षेत राहत नसल्याने रुग्ण संख्या वाढत असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे . त्याच्या संपर्कात येत असलेले रुग्ण संख्या वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे त्यामुळे राजापूर येथे प्राथमिक शाळा येथे विलीनीकरण कक्ष सुरू करण्यात आले असून येथे रुग्णांना उपचार करण्यात यावा अशी मागणी नागरिक व ग्रामस्थांनी केली आहे तसेच ग्रामपंचायतीने याकडे व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन राजापूर येथील कोरणा ची साखळी तोडण्यासाठी विशेष असे प्रयत्न करण्यात यावे असे ग्रामस्थांची मागणी आहे राजापूर येथील जाधव कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला असल्याने चिंतेचे ढग उभे राहिले आहे राजापूर गाव कडकडीत बंद असल्याने रिकाम्या फिरणाऱ्या वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सध्या होत आहे व प्रशासनाने गावांमध्ये विनाकारण फिरणाऱ्या गुन्हा दाखल करण्यात यावा यामुळे लोकांचा एकमेकांपासून संपर्क दूर होईल . विलिनीकरण कक्षात या रुग्णांवर उपचार करण्यात यावा व ग्रामपंचायतीने व कोरोना कमिटीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे तसेच राजापुर प्राथमिक आरोग्य केंद्रात येथील गावासाठी लस उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे.
Tags:
आरोग्यविषयक

