दक्ष पत्रकार संघाचे राहुरीचे संपादक तसेच संस्थापक मा रोहिदास दातीर यांची हत्या,

ank News Marathi team rahuri Deat,07.04.2021. ank News Marathi मुख्य संपादक,अशोक कराळे,वैजापुर, दक्ष पत्रकार संघाचे राहुरीचे संपादक तसेच संस्थापक मा रोहिदास दातीर यांची हत्या,
राहूरी बुधवार दिनांक 6 एप्रिल 2021 रोजी 12:00 वाजेच्या दरम्यान मल्हारवाडी रोड वरून घरी स्कुटी वरून जात असताना एका स्कार्पिओ गाडीतून आलेल्या अज्ञात लोकांनी अपहरण करून नंगट व्यक्तींकडून हत्या झाल्याचे समोर दिसून येत आहे. राहुरी येथील दक्ष पत्रकार झुंजार संघाचे संपादक रोहिदास दातीर हे समाजातील दुष्ट प्रवृत्ती विरुद्ध सतत कार्यरत गोरगरिबांसाठी धडपडणारी आणि अन्याय विरुद्ध आवाज उचलणारा अवलिया व्यक्तीमहत्त्व आज आपल्यातून निघून गेले अशा पाठीमागून भ्याड हल्ला करणाऱ्या निर्लज्ज या लोकांवर कडक कारवाई करून पोलीस प्रशासनाने पत्रकारावर होणारे हल्ले आणि आज जे हत्या करण्यात आली यांना कायमचा धडा शिकवायला हवा या प्रकरणातील संबंधित जे पण व्यक्ती असतील त्यांच्यावर भयंकर शिक्षा करण्यात यावे जेणे कुठल्याही पत्रकार बंधू-भगिनींना ज्यांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानले गेले आहेत त्यांना सुरक्षा प्रधान्य करण्यात येईल आज पत्रका आपला जीव पणाला लावून समाजासाठी कार्यरत आहे आज पोलिस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे समाजातील लोकांच्या अडचणी त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार हे समाजापुढे मांडत असतो अशातच असे प्रकार घडत असतील तर पत्रकारांनी कशा पद्धतीने काम करायचे? हे हल्ले कधी थांबणार ?पत्रकार सुरक्षा कायदा फक्त देखावा आहे काय? त्यात काही तथ्य आहे असे प्रचंड प्रश्न उभे राहतात अशा अतिशय क्रूर निंदनीय प्रवृत्तीविरुद्ध सरकारने धडाडीचे निर्णय घेऊन गुंड नंगट प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध मोहीम राबवावी आणि अशा दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्ती विरुद्ध कडक कारवाई करून आळा घालावा,

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक