ank news Marathi team
Aurungabad
Deat, 30.01.2021
राष्ट्राच्या निर्मात्याला मारहाण वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
वैजापूर तालुक्यातील गोयगाव येथील शिक्षक यांना गावातीलच एका पालकाने मारहाण केली म्हणून म्हणून वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की गोयगाव येथील शिक्षक गवळी हे शाळेमध्ये शिष्यवृत्ती फॉर्म भरत असताना पहीलीचा मुलगा शाळेत येऊन बसल्याने कोरोना मुळे फक्त 5 वि ते 10 वीच्या मुलांना पालकांच्या परवानगी ने बसण्याची मुभा असल्याने शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन व्ह्यावे या हेतूने त्या मुलास घरी जाण्यास सांगितले. मुलाने घरी जाऊन सांगितले सरांनी घरी पाठवले म्हणून पालकाने शाळेत येऊन सदरील शिक्षकाला शिव्या देत मारहाण केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून वैजापूर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली.यानंतर शिक्षक संघटना यांना माहिती मिळताच संघटनांनी आक्रमक होत पोलीस ठाण्यात आपल्या शिक्षक बांधवांसाठी पाठिंबा जाहीर करत झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत तहसीलदार राहुल गायकवाड यांना निवेदन दिले.पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील घटनेच्या आरोपी पालकास पोलीस ठाण्यात हजर केले.शिक्षक संघटना ची पोलीस ठाण्याबाहेर निषेध करत गर्दी जमली होती.त्यामुळे सदरील व्यक्तिविरोधात कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्राच्या निर्मात्यांचा हा अपमान म्हणजे देशाला अधोगतिकडे नेणे आहे
Tags:
प्रशासकीय

