मुंबई नागपूर चौफुली वैजापूर येथे,राषेनचा तांदूळ काळ्याबाजारात विकण्यारा टेम्पो पकडला,

 Ank news Marathi team aurungabad

Deat,06, 09,2020


मुंबई नागपूर चौफुली वैजापूर येथे,राषेनचा तांदूळ काळ्याबाजारात विकण्यारा टेम्पो पकडला, 


वैजापूर प्रतिनिधी, दादासाहेब तांबे, लोणी वैजापूर, 





वैजापूर शहरालगत असलेल्या गंगापूर चौफुली येथे शनिवार (ता.०५) रोजी भल्या पहाटे  रेशनचा तांदूळ घेऊन जात असल्याच्या संशयावरून वैजापूर पोलीसांच्या पथकाने दबंग कारवाई करत मोठ्या शिताफीने तांदळाने भरलेला टेंपो ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात उभा केला. मात्र दुपारी पाच वाजेपर्यंत  महसूल प्रशासनाला पंचनामा करावयाचे पत्र देण्यापलीकडे  कुठलीही कारवाई पोलीस प्रशासनाकडून झाली नाही.

                  याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी पहाटे  पोलीस कर्मचारी रजाक शेख, जालिंदर तमनार व संतोष पवार यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, गंगापूर चौफुली येथे सुमारे तीन टन रेशनचा तांदुळ  ४०७ टेंपोने काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणार आहे. सदरील माहिती मिळताच तिन्ही कर्मचाऱ्यांनी गंगापूर चौफुली येथे पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास माहितीतील टेंपो पकडला. यावेळी पोलीसांनी टेंपो चालकाला वाहनात असलेल्या मालाबाबत चौकशी केली. मात्र चालकाने उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केल्याने पोलीसांचा संशय बळावल्याने त्यांनी वाहनाची तपासणी केली असता त्यांना वाहनात तांदूळ आढळून आला. मात्र या तांदळाची कुठलीही कागदपत्रे चालकाकडे  आढळून न आल्याने पोलीसांनी वाहन ठाण्यात आणून उभे केले.

                     याप्रकरणी पोलीस प्रशासनाने  महसूल प्रशासनाला पंचनामा करण्यासाठीचे पत्र दिले. पंचनामा झाल्यानंतर  आणखीन चित्र स्पष्ट होणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक