Ank news marathi team
Bhuldhana,
Deat, 09,06,2020
प्रतिनिधी विलास बोडखे बुलढाणा (सग्रामपुर) 8600619181
पीक विम्याची रकमेसाठी स्वाभिमानीने केलेल्या आंदोलनाला यश. प्रशांत डिक्कर यांच्या आक्रमकतेपुढे बँक प्रशासन हादरले.
संग्रामपुर : पीक विम्याची रक्कम कर्ज खात्यात जमा न करता शेतकऱ्यांना द्या या मागणीसाठी स्वाभिमानीने नियोजित कार्यक्रमानुसार बँकेसमोर केलेल्या आक्रमक आंदोलनाला यश येऊन सदर रक्कम शेतक-यांना मिळणे सुरु झाले. स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाने बँक प्रशासनाने नमते घेतले, यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या रकमेची फार मोठी समस्या सुटली आहे.
स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यां सह शेतक-यांनी संग्रामपुर येथील बँक समोर सुरु केलेल्या आंदोलनामुळे प्रशासकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. मागील वर्षीच्या हंगामात अपेक्षित उत्पादन न आल्याने पिक विमा कंपनीने नुकसान भरपाईची रक्कम बँकेकडे दिली, पण सदर बँकांनी ती रक्कम शेतकऱ्यांना न देता त्यांचे कर्ज खात्यात जमा करण्याचा फंडा वापरला त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले होते.
कोरोणाच्या महामारीचा फटका सर्वाधिक शेतकऱ्यांना बसला त्यामुळे आर्थिक दृष्ट्या शेतकरी नंगा झाला.असी सर्ववस्तु स्थिती असतांना पीक विम्याची रक्कम बँका शेतक-यांना देत नव्हत्या.यासाठी शेतकरी दररोज बँकेत चकरा मारत होते. पण तरी ती रक्कम मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी स्वाभिमानी कडे हि कैफत कथन केली यावर विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी रीतसर निवेदन देऊन ९ जुनच्या तारखेचा अल्टिमेटम दिला होता.
जटिल समस्या घेऊन शेतकरी लोकप्रतिनिधी चाही दारावर फिरत होते ही वस्तुस्थिती आहे. पण तरी बँक प्रशासन ऐकण्यास तयार नव्हते. अखेर आज स्वाभिमानीचे कार्यकर्ते ७०० ते ८०० शेतकरी घेऊन बँकेत गेले असता बँकेने नरमाईची भूमिका घेतली.
स्वाभिमानीचा आंदोलनाचा धसका घेतल्याने जिल्हा प्रशासनाने आजच्या आंदोलनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावल्याने काही वेळ तनाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पण स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी शेतकऱ्यांना आव्हान करत मर्यादा पाळण्याची भावनिक आवाहन केल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. अखेर स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर, तहसीलदार समाधान राठोड ,तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोड ठानेदार भुषन गांवडे,पी.एस.आय.श्रीकांत विखे,सहाय्यक निबंधक जुमळे मॅडम,अधिकारी,तालुक्यातिल सर्व राष्ट्रीयकृत बँक मॅनेजर,यांच्यात चर्चा झाली.
स्वाभिमानी मागणीवर ठाम राहिल्याने बँक प्रशासनाने नरमाईची धोरण घेत पीक विम्याची रक्कम देण्याचे कबूल केले.तर यावेळी काही शेतकऱ्यांनी रक्कम सुद्धा विड्राल केली. राजकीय पक्षाच्या पुढा-यांना जे करता आले नाही ते स्वाभिमानीने करून दाखवले अशी प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
तर विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी शेतकऱ्यांची दखल घेत केलेल्या आंदोलनाची आज सर्वत्र प्रशंसा झाली.
या वेळी आंदोलनात रोशन देशमुख,जिल्हाध्यक्ष अनंत मानकर, विधानसभा संपर्कप्रमुख मोहन पाटील, तालुकाध्यक्ष योगेश मुरुख, प्रवीण रौदळे,सुनील अस्वार, स्वाभिमानीचे कार्यकर्ते व बहुसंख्य शेतकरी हजर होते..

Tags:
सामाजिक