विधान परिषदेवर संधी देण्यात यावी आशिष देशमुख यांची राज्यपाल महोदयांकडे मागणी

Ank news marathi team
 Beed
 Deat, 23,06,2020,

प्रतिनिधी:-आशिष देशमुख बीड

विधान परिषदेवर संधी देण्यात यावी आशिष देशमुख यांची राज्यपाल महोदयांकडे मागणी


महाराष्ट्र राज्य राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यपदी नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते आशिष देशमुख यांनी केली आहे.

आशिष देशमुख हे गेल्या बारा वर्षापासून सतत सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. त्यांनी विविध सामाजिक प्रश्‍नावर वेळोवेळी आंदोलने, उपोषणे केलेली आहेत.

 सर्व जाती, धर्मातील लोकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आशिष देशमुख हे नेहमीच प्रयत्नशील असतात. विधान परिषदेवर संधी दिल्यास भारतीय राज्य घटनेचे नियम पाळून सामान्य जनतेचे प्रश्‍न मार्गी लावण्याचे आणि भारतीय लोकशाही बळकट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन असा विश्‍वास देऊन राज्यपाल महोदयांनी विधान परिषद सदस्यपदी नियुक्ती करावी अशी आग्रही मागणी राज्यपाल महोदयांकडे सामाजिक कार्यकर्ते आशिष देशमुख यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक