Ank news marathi team aurungabad
Deat, 07,05,2020
मुख्य संपादक, अशोक एन कराळे
वैजापूर औरंगाबाद
वैजापूर चढ्या दराने माल विक्री करणाऱ्या दुकानावर तहसिलदार महेंद्र गिरगे यांची कारवाई.
महाराष्ट्र राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असतांना वैजापूर शहरातील गंगापुर रस्त्यालगत असलेल्या एका हार्डवेअर दुकानात कृषी साहित्याच्या नावाखाली कच्च्या बिलासह साहित्य विक्री करणाऱ्या एका दुकानावर आज सकाळच्या सुमारास तहसिलच्या पथकाने छापा टाकला.
शहरालगत असलेल्या मनमोहन ऍग्रो सर्व्हिसेस या दुकानात मागील काही दिवसांपासून चढ्या दराने सिमेंट, पत्रे व कांदा चाळीस लागणारे साहित्य हे कच्च्या बिलासह व चढ्या दराने विक्री सुरू असल्याची माहिती तहसीलदार महेंद्र गिरगे यांना मिळाली.
माहिती मिळताच सकाळी 10 वाजेच्या सुमारास तहसीलदार गिरगे यांनी या दुकानावर बनावट ग्राहक पाठवून दुकान चालू असल्याची व साहित्याची चढ्या दराने विक्री सुरू असल्याची खात्री मिळाल्याने नायब तहसीलदार वाणी,सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ पाटील,पारस पेटारे,किसन गवळी,गुणवंत थोरात आदींच्या पथकाने या दुकानावर छापा टाकून पंचनामा केला.
यावेळी दुकानासमोर साधारणपणे 20 वाहनांची गर्दी दिसून आली व त्या ठिकाणी उभे असलेल्या वाहनात चाळीस पत्रे व सिमेंट गोण्या भरलेल्या आढळून आल्या याशिवाय दुकानातील वजन काट्याच्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्यात आले नसल्याचे पथकाला आढळून आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा मनाई आदेश असतांना देखील दुकान सुरू ठेऊन कच्च्या बिलासह चढ्या दराने साहित्य विक्री सुरू असल्याने ही कारवाई झाली असल्याने परीसरातील नफेखोर दुकानदारांचे धाबे दणाणले आहे.

Tags:
प्रशासकीय