बीड पेठ भागात तिहेरी हत्याकांड, एका महिलेसह दोन मुलाची हत्या,,,

Ank news marathi team
(बीड,) Deat, 24,05,2020

मुख्य संपादक, अशोक कराळे वैजापूर औरंगाबाद

बीड पेठ भागात तिहेरी हत्याकांड, एका महिलेसह दोन मुलांची हत्या,,,


बीड शहरातील पेठ बीड भागात एका महिलेसह तिच्या दोन मुलांची हत्या केल्याची घटना आज (दि. २४) दुपारी उघडकीस आली. या तिहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच पेठ बीड पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

पेठ बीड भागातील शुक्रवारी पेठ येथे राहणारी महिला संगीता संतोष कोकणे (वय ३१), संदेश संतोष कोकणे (१०) व मयूर संतोष कोकणे (७) यांचे मृतदेह रविवारी राहत्या घरी आढळून आले. संगिता व त्यांच्या एका मुलाच्या डोक्यात दगड घालून अथवा तीव्र हत्याराने वार केल्याने त्यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. तर, अन्य एका मुलाचा मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये आढळून आला.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारतकुमार राऊत, पेठ बीड पोलिस ठाण्याचे पोलिस निरक्षक विश्‍वास पाटील यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती बीड शहरात वार्‍यासारखी पसरल्याने एकच खळबळ उडाली. घटनास्थळी इतर नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, हे हत्याकांड अनैतिक संबंधाच्या संशयातून घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. तर, महिला संगीता हिच्या पतीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक