वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथील सीसीआई कापूस खरेदी केंद्राला सुरुवात, Ank news marathi live channel,जोरदार दनका, प्रशासन खडबडून जागी
Ank news marathi team
Yaijapur
Deat, 04,05,2020
प्रतिनिधी, संदिप गायके, आचंलगाव वैजापूर औरंगाबाद
संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारत देश लॉकडाऊन करण्यात आलेला आहे, त्यामुळे 17 मार्च 2020 पासून शिऊर बंगला येथील CCI कापूस खरेदी केंद्र बंद करण्यात आले होते, परंतु शेतकऱ्यांकडील 35 ते 40 टक्के कापूस अजून बाकी आहे, या अनुषंगाने सर्व शेतकरी वर्गाने कृ.ऊ.बाजार समितीचे सभापती संजय पाटील निकम व सर्व संचालक मंडळ व वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्याकडे त्यांचे होणारे नुकसान व कर्जबाजारीपणा या सर्व गोष्टींची कैफियत मांडली व सभापती यांनी दि.28 एप्रिल 2020 या रोजी कृ.ऊ. बाजार समिती वैजापूर येथे उपविभागीय अधिकारी संदीप सानप साहेब, आमदार बोरणारे सर , उपनिबंधक व्ही आर घोटे साहेब, सचिव सिनगर साहेब, CCI ग्रेडर धर्मेंद्र नायक व सर्व संचालक मंडळ यांच्या बैठकीतून कापूस खरेदी केंद्र पुन्हा चालू करण्याचा निर्णय झाला, आतापर्यंत बाजारसमितीकडे 2622 वाहनांची ऑनलाईन नोंदणी झालेल्या आहेत व त्यांपैकी 370 वाहने खाली झालेली आहेत व उर्वरित सर्व वाहने बाकी आहे, या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन, दि. 4 मे रोजी CCI कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन विधानपरिषदेचे आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले व CCI कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे त्यामळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडतांना दिसत आहे. यावेळी आमदार रमेश बोरणारे, सभापती संजय निकम,उपसभापती रिखब पाटणी व सर्व संचालक, जिल्हा परिषद सभापती अविनाश पाटील गलांडे, मा., जिल्हा परिषद सदस्य सुनील पैठणपगारे, जितेंद्र जगदाळे,शिऊर चे सरपंच नितीन चुडीवाल व पंचक्रोशीतील सर्व सरपंच, चेअरमन व शेतकरी वर्ग उपस्थित होते..
Tags:
शेतकरी




