विरगाव पोलिसांनी अवघ्या 12 तासात अल्पवयीन मुलीचा लावला छडा..

विरगाव पोलिसांनी अवघ्या 12 तासात अल्पवयीन मुलीचा लावला छडा..

Ank news marathi team
Yaijapur
Deat, 03,05,2020


प्रतिनिधी, सचिन मोईन वैजापूर

पोलिस स्टेशन विरगाव हद्दीत लाॅकडाऊन मध्ये कापूस वडगाव येथील अल्पवयीन मुलगी घर सोडून गेल्याची तक्रार मोलमजुंरी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब वडीलाने माझी मुलगी शोधा साहेब, अशी विनवणी स पो नि विश्वास पाटील यांना केली, त्यावर विश्वास पाटील यांनी त्या मुलीच्या वडिलांना विश्वास दिला, तुमची मुलगी काही तासात शोधू.








त्यांनतर स पो नि, विश्वास पाटील यांनी सदर माहिती मा,ग्रामिण पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील मॅडम , sdpo वैजापूर श्री रांजणकर साहेब यांना कळवून त्यांचे निर्देशा प्रमाणे पोलिस स्टेशनचे सहकारी psi गटकूळ, पो ह कसोदे , पो ना 773 धनुरे, सोनवणे, बर्डे, दंडेवार,महिला कर्मचारी भोये, सह स्वतः लक्ष घालून सदर मुलगी कुठे मिळेल याची माहिती गोळा करून शोध पथक रवाना केले व अवघ्या 12 तासात मुलीचा शोध घेऊन वडिलांच्या ताब्यात दिली, याकरिता वांजरगाव पोलीस पाटील, लाडगाव पोलीस पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. मुलीचे वडिलांनी स, पो, नि, पाटील व त्यांच्या टीमचे मनापासून धन्यवाद मानले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक